News 34 chandrapur
चंद्रपूर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्री मंडळात लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना कॅबिनेट मंत्रीपद बहाल करण्यात आले. Shinde sarkar
सद्या झालेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारात विदर्भातील एकमात्र कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना बहुमान मिळाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. Sudhir mungantiwar
ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पुन्हा कॅबिनेट मंत्री झाल्यावर चंद्रपूर महानगरीत शुक्रवार 12 ऑगस्टला सायं 6 वाजता प्रथम आगमन होत आहे.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात विविध ठिकाणी नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे स्वागत भाजपा,महिला मोर्चा, भाजयुमो व इतर आघाड्यांमार्फत केले जाणार आहे. Bjp chandrapur
महानगर भाजपा तर्फे ट्रायस्टार हॉटेल, वृंदावन नगर, तुलसीनगर,राष्ट्रवादी नगर,एन.टी. हॉटेल,जनता कॉलेज,वरोरा नाका,रेस्ट हाऊस समोरील दरगाह, संजय गांधी मार्केट, प्रियदर्शीनी चौक,जटपुरा गेट ,छोटा बाजार चौक,जयंत टॉकीज चौक,चर्च समोर, बगीचा समोर,लक्ष्मीनारायण मंदिर,आणि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा हे स्थान स्वागतासाठी निश्चित करण्यात आले असून गांधी चौक येथे ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाने समारोप केला जाणार आहे.chandrapur news नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कसंगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर व इतर आघाड्यांच्या जिल्हाध्यक्ष व मंडळ प्रमुखांनी केले आहे.