News 34 chandrapur
गोंडपीपरी - पुराशी दोन हात करणाऱ्या आर्वी गावात भयंकर स्थिती उद्दभवली आहे.पुराने वेढा दिला असतांना गावात तापाची साथ उद्भवली.गावातील रूग्णांना उपचारासाठी ट्रक्टरने जंगल मार्गाने हलविले जात आहे.गावावर ओढावलेल्या या संकटात दोन डाॕक्टर धावून गेले. Well done doctor
डॉ.आशीष आसुटकर, डॉ.अभिषेक साठे यांनी भर पुरातून डोंग्यांनी गाव गाठले.गावातील रूग्णांवर उपचार सूरू आहेत. Chandrapur flood
गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी गावात दुहेरी संकट उद्भवले आहे.एकतर पुरामुळे मार्ग बंद झाले आहेत दुसरीकडे गावात तापाची साथ उद्भवली आहे. गावातील तीन वर्षाखालील मुले तापाने फणफणत आहेत तर प्रौढांनाही तापाने घेरलं आहे. उपचारासाठी काही आई-वडील थेट जंगलातून वाट काढीत आहेत. मात्र ताप आलेल्या मुलांची संख्या अधिक असल्याने थेट ट्रक्टरने जंगल मार्गे रूग्णांना उपचारासाठी हलविले जात आहे. Accompanied by fever
गावावर ओढावलेल्या संकटात प्राथमिक आरोग्य केंद्र तोहोगावाचे वैद्यकीय अधिकारी डाॕ.आशीष आसुटकर, डाॕ.अभिषेक साठे धावून गेले आहेत.भर पुरातून डोग्यांनी या दोघांनी गाव गाठले.गावातील रूग्णांची तपासणी केली. Flood 2022