News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या राज्यउपाध्यक्ष तथा मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता व मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांचा विदर्भ दौरा सुरू आहे. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातही स्थानिक विश्रामगृह येथे महिला सेनेची आढावा बैठक घेतण्यात आली. Chandrapur mns
महिलांना येणाऱ्या समस्या, महिलांसाठी असलेल्या विविध योजना ह्या सामान्य पर्यंत पोहचाव्या तसेच महिलांनी रोजगार स्वयंरोजगार यावर भर देऊन स्वतःच्या पायावर उभे होऊन सक्षम व्हावे यासाठी सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड व जिल्हाउपाध्यक्ष शोभाताई वाघमारे, नगरसेवक सीमा रामेडवार यांनी केले होते. यावेळी सविस्तर चर्चा करीत अडचणीत सापडलेल्या महिलांनी भेट घेत त्यांची व्यथा मनसेच्या दरबारी मांडली. यावेळी महिला सेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. Mns adhikrut
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंग, अरूणा श्रीकुंडावार,सुचिता रामेडवार, वाणी सादलावार, वर्षा भोमले, वर्षा पडगीलवार,प्रियंका चहारे, शामिम खान,अर्चना आमटे,प्रीती रामटेके, विमल लांडगे, राजिद शेख मनसे, सरू चतुलवार, मंगला चांदेकर,योगिता धोपटे, सचिव किशोर मडगुलवार, जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्राम. सदस्य विवेक धोटे, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, करण नायर, मयूर मदनकर, ग्राम.पं. सदस्य नितीन टेकाम, मनोज तांबेकर, सुयोग धनवलकर, पियुष धुपे, राज वर्मा व असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या.