News 34 chandrapur
चंद्रपूर - अतिवृष्टीने घरांचे नुकसान झालेल्या कुटुंबीयांना मिळत असलेली 5 हजार रुपयांची शासकिय मदत अत्यंत कमी असुन ती वाढविण्यात यावी अशी मागणी पावसाळी अधिवशेनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. याची तात्काळ दखल घेत सदर मदत 5 हजाराहुन 15 हजार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. Agriculture under water
यंदाचा पावसाळा चंद्रपूरकरांसाठी मोठे संकट घेउन आले. या पावसाने आलेल्या पुराने अनेकांची शेतपिके पाण्याखाली गेली तर शहरातील अनेक घरांची पडझड झाली. त्यामुळे सदर कुटुंब उघड्यावरती आले. सदर घरांचे पंचनामे करुन त्यांना शासकिय मदत करण्यात आली. मात्र यातील अनेक घरे ही नजुलच्या जागेवर असल्याने त्यांना केवळ पाच हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही मदत अत्यंत कमी आहे. त्यामुळे सदर पिढीत कुटुंबांना वाढीव मदत देण्यात यावी अशी मागणी काल अधिवेशनाच्या दिस-या दिवशी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. Flood situation
याची तात्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असुन आज बोलतांना त्यांनी सदर पिढीत कुटुंबांना मिळणारी पाच हजार रुपयांची मदत वाढवून 15 हजार रुपये करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे.
