News 34 chandrapur
घुग्घुस : एसीसी सिमेंट कंपनीतून चाकूचा धाक दाखवून साईराज नावाच्या सिमेंट पिशव्यांची चोरीचा प्रयत्न फसल्याचा प्रकार उघळकीस आला आहे. सूरक्षा रक्षकांचा सतर्कतेने चोरांचा डाव फसला. काँग्रेसचे नेते राजूरेड्डी यांनी या प्रकाराची तक्रार पोलीसात केली आहे.
Crime news
Crime news
काही दिवसापुर्वी नाॕट फाॕर रिसेल सिमेंटच्या नावावर राजूरेड्डी यांना गोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. चाकूचा धाक दाखवून केवळ दोन बॕग सिमेंट चोरी करण्याचा हा प्रकार राजकीय सूडबुध्दीतून झाला तर नाही ना ? याची चर्चा शहरात रंगली आहे.
19 आगस्टचा रात्री तीन अज्ञात आरोपीने तोंडावर रुमाल बांधून रात्री जवळपास अकरा वाजता एसीसी Acc cement कंपनीत प्रवेश केला. एका आरोपीने कंपनीच्या आत कामाच्या ठिकाणी झोपलेल्या अन्य ठेकेदारांच्या कामगारांना चाकू दाखवून गप्प राहण्यास सांगितले. उर्वरित दोन आरोपीनी कंपनीच्या साईराज सिव्हिलचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणाहून दोन सिमेंट पिशव्या डोक्यावर घेवून जावू लागले. हा प्रकार सुरक्षारक्षकांचा लक्षात येताच त्यांनी धाव घेतली. सूरक्षारक्षक येताना बघून चोरांनी सिमेंट बॅग cement bag टाकून पोबारा केला. घटनेची माहिती कंपनीचे मुख्य सुरक्षारक्षक जोगिंदर सिंग यांनी राजूरेड्डी यांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक बबन पुसाटे यांची भेट घेऊन त्यांना प्रकरणाची माहिती दिली. रेड्डी यांनी रीतसर तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
शहरातील राजकारणात तसेच जिल्ह्यातील राजकारणात आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनसामान्याच्या मनात आपला वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या राजूरेड्डी यांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला बंद करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून नॉट फॉर रीसेल not for resale सिमेंटच्या नावावर सतत षडयंत्र रचण्यात येत आहेत.
complot
गेल्या दोन महिन्यापूर्वी कोसारा येथे खुल्या जागेत नॉट फॉर सेल टाकण्यात आले व त्यावर बनावटी साईराज लिहल्याचे उघड झाले होते. रेड्डी हे सिव्हील कॉन्ट्रॅक्टर असल्याने त्यांना राजकारणातून बाद करण्यासाठीच हे चोरी प्रकरण रचण्यात आले असल्याचा संशय असल्याने या प्रकरणाची तातळीने चौकशी करून रेड्डी यांच्या विरोधात कट रचणाऱ्याचा भंडाफोड करावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे.