News 34 chandrapur
चंद्रपूर - जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सलग 3 कारवाया केल्याने लाचखोरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. Acb trapमौजा पोवनी येथे राहणारे तक्रारदार यांचे 4 कृषी केंद्र विक्री परवाने सरकारीपोर्टल वर अपडेट करून 1 नवीन परवाना व कृषी केंद्र परवाने स्थलांतर करण्याच्या कामाकरिता कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायक जया महेश व्यवहारे यांनी 10 हजारांची लाच झेरॉक्स सेंटरचे वैभव धोटे यांना स्वीकारताना रंगेहात अटक केली. agriculture assistant arrested
कृषी परवाने स्थलांतर करण्याच्या कामासाठी कृषी सहायक जया व्यवहारे व खाजगी इसमाला रंगेहात अटक करण्यात आली. Bribe
5 ऑगस्ट ला तक्रारीची पडताळणी केल्यावर पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, रमेश दुपारे, नरेश ननावरे, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, वैभव गाडगे, मेघा मोहूर्ले, पुष्पा काचोळे यांनी यशस्वीपणे पार पाडली.