News 34 chandrapur
राजुरा :- राजुरा तालुक्यातील देवाडा व अन्य गावातील गॅस्ट्रेाच्या उद्रेकाला जिल्हा आरोग्य अधिकारी जबाबदार असून परिस्थितीची संपूर्ण जाणीव असतांना हलगर्जीपणामुळे देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात येथील 3 रुग्णांचा मृत्यु होणे ही बाब आरोग्य खात्याचे धिंडवडे काढणारे असल्याची संतप्त प्रतिक्रीया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देवाडा येथे भेट दिल्यानंतर व्यक्त केली. disease
दुषित पाण्यामुळे देवाडा येथे रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचे ठावूक असतांना ग्रामसेवकाने आपल्या कर्ताव्यात कसूर केल्याने या गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जर लोकांना वेळीच शुध्द पाणी पुरविल्या गेले असते तर या गावात 4 रुग्णांवर मृत्यु ची पाळी उद्भवली नसती. रुग्णालयात 3 रुग्ण दगावले व 1 रुग्ण घरी दगावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णाची नोंद नसली तरी अजूनही गावातली परिस्थिती भयावह असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. Diarrhea
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 97 रुग्ण दाखल करण्यात आले असून त्यात देवाडा सह, सोंडो, टेंभुरवाही व अन्य गावातील रुग्णांचा समावेश असतांना आरोग्य यंत्रणा झोपा घेत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करीत अहीर यांनी देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दुरवस्थेबद्दल नाराजी व्यक्त करुन येथील आरोग्य कर्मचाऱ्यांवर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याची बाब अधोरेखीत केली आहे. या ठिकाणी डॉक्टर्स, कर्मचारी उपस्थित नसतात. जे Mbbs डॉक्टर आहेत ते येतच नाही असे नागरीकांचे म्हणणे आहे. Chandrapur health system त्यामुळे एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर हे केंद्र चालत असल्याने गॅस्ट्रेाचे गांभीर्य वाढले असल्याचा आरोप हंसराज अहीर यांनी केला असून या एकंदर प्रकाराला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. Gastro
गॅस्ट्रेाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनास शुध्द पेयजलाची तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याची सूचना करतांनाच या संपूर्ण प्रकरणाचा वरीष्ठांना जाब विचारु असेही हंसराज अहीर यांनी ग्रामस्थांशी बोलतांना सांगीतले. त्यांनी गॅस्ट्रेानी दगावलेल्या रुग्णांप्रती संवेदना व्यक्त केली. Hansraj ahir