News 34 chandrapur
चंद्रपूर - लहानपणी आपल्यासोबत खेळणारा, बागडणारा मित्र, मायभुमीच्या देशसेवेसाठी सैन्यात भरती झाला. अन तब्बल 22 वर्षाच्या देशसेवेनंतर आपली जन्मभूमी चंद्रपुरात सेवानिवृत्त होवून परतताच येथील मित्रमंडळींसह त्याच्या परिसरातील नागरिकांच्या आनंदाला पारावारच उरला नाही.
या सैनिकाचे स्वागत जल्लोष करून येथील नागरिकांनी केले. यावेळी ढोल ताशांच्या गजरात बीएसएफचे जवान गजानन भाऊराव तुराणकर यांच्यावर पुषपृष्टी करत माता नगर वॉर्ड भिवापूर येथील नागरिकांनी त्यांचे जल्लोषा स्वागत केले.
गजानन तुराणकर हे 31 डिसेंबर 2000 रोजी बीएसएफ BSF मध्ये दाखल झाले. त्यांनी वेकंठपूर सालीगुडा नार्थ बंगाल येथे सैन्यदलातील खडतर प्रशिक्षण घेवून पहिली पोस्टींग 56 वाहिनी गोगालॅन्ड, श्रीनगर, त्यानंतर मेघालय, शीलॉंग, छत्तीसगढ एन्टी नक्शलाईट ऑपरेशन, न्यू कोच बिहार, अशा विविध स्थळी देशसेवा देत शत्रुशी दोन हात केले.
Indian army लहानपणापासूनच त्यांना सैन्यदलात कार्य करण्याची आवड होती. तशी त्यांना संधीही मिळाली व तब्बल 22 वर्षे त्यांनी भारत मातेची देशसेवा केली. सेवानिवृत्तीनंतर ते आपल्या जन्मभूमी चंद्रपुरात दाखल होताच भिवापूर वॉर्ड येथील जनतेने त्यांच्या देशभक्ती व कार्याला सलामी देत भव्य स्वागतपर रॅली काढून सैनिक गजानन तुराणकर यांचे मनस्वी स्वागत केले. Border security force
देशातील तरुण पिढीने आज सैन्यात जावे, विदर्भात होणाऱ्या सैन्य भरती मेळाव्यात तरुणांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी तुराणकर यांनी केले.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र आखरे, संजय चौखे, अमोल कामडे, शरद थिपे, मंगेश मालेकर, मेश्राम, गरु किनेकर, माजी नगरसेवक अजय खंडेलवाल व परिसरातील प्रतिष्ठीत मंडळींनी पुष्पहार देवून त्यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागत रॅलीत परिसरातील बालगोपाल व इतर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Retirement celebration