News 34 chandrapur
राजुरा : राजुरा क्षेत्रातील जिवती व कोरपना या अतिदुर्गम व नक्षग्रस्त तालुक्यातील आदिवासी विधार्थ्यानी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीरभाऊ मनगंटीवार यांच्या पुढाकारातून "मिशन शौर्य 2018" अंतर्गत जगातील सर्वात उंच शिखर गाठून महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली होती. त्यावेळेस एव्हरेस्ट विरांना सरकारने गृह विभागात नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते.
याचा सातत्याने पाठपुरावा करुन सुद्धा महाविकास आघाडी सरकारने नोकऱ्या दिल्या नाही. आता नव्याने सत्तेत आलेल्या सरकारकडे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी मुंबई येथे नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ, नियोजन व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेउन याअगोदर दिलेल्या आश्वासनानुसार गृह विभागात सुरु असलेल्या जम्बो भरतीत एक विशेषबाब म्हणुन नोकऱ्या देण्याबाबत निवेदन दिले व यासंबंधाने सुधीरभाऊ मनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री व संबंधीत अधिकारी यांच्या भेटी घेउन याविषयावर चर्चा केली.
Devendra fadnavis
तत्कालिन जिल्हाधिकारी आशितोष सलिल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे तत्कालिन प्रकल्प अधिकारी डी. दयानिधी यांच्या उत्कृष्ठ नियोजनातून आदिवासी विकास विभाग व चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या मिशन शीर्य २०१८ च्या पहिल्या टप्यातील उपक्रमाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधासनभा क्षेत्रात येणाऱ्या कोरपना व जिवती या अतीदुर्गम, आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागातील ५ आदिवासी विद्यार्थ्यांनी जगातील सर्वाधिक उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर करूण यशाचा झेंडा रोवून महाराष्ट्रासह, चंद्रपूर जिल्ह्याची व आदिवासी विकास विभागाची सुद्धा मान अभिमानाने उंचावलेली होती.
Mission Shaurya 2018
या सर्व आदिवासी विद्यार्थ्याच्या पराक्रमी कामगीरीबद्दल देशाचे महामहीम राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, संरक्षण मंत्री, राज्याचे महामहीम राज्यपालसह अन्यविभागच्या मंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी एव्हरेस्ट विरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविले. व एव्हरेस्ट विरांना प्रत्येकी २५ लक्ष रूपये सानुग्रह अनुदान देऊन सन्मानित करण्यात आले होते. याच वेळेस एव्हरेस्टविरांना त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार गृह विभागात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
आता या सर्व शौर्यविरांनी नोकरी साठीची आवश्यक पात्रता पूर्ण करूण जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फतीने अर्ज करूण नोकरी देण्याची विनंती केलेली आहे. परंतू तत्कालिन महाविकास आघाडीच्या सरकारने एव्हरेस्टविरांच्या नोकरीच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न देता टाळाटाळ करण्याचे धोरण अवलंबिले होते.
Mount Everest
त्यामुळे त्यांना अजून पर्यंत गृहविभागात नोकऱ्या मध्ये समावून घेण्यात आलेले नाही. सध्या त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांनी नोकरी साठी केलेली मागणी अत्यंत रास्त आहे. राज्यात जम्बो पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. Police Recruitment
या पोलीस भरतीत उपरोक्त एव्हरेस्ट विरांना त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार पोलीस विभागात एक विशेष बाब म्हणून नियुक्ती देणे अत्यंत आवश्यक असून एव्हरेस्ट विर मनिषा धर्मा धुवे, उमाकांत सुरेश मडावी, प्रमेश सिताराम आडे, कविदास पांडूरंग काटमोडे, विकास महादेव सोयाम यांना गृह विभागात होणाऱ्या जम्बो पोलीस भरती मध्ये एक विशेष बाब म्हणून नियुक्त्या देऊन आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे भाजप सेना युती सरकारमध्ये मिशन शौर्य ही संकल्पना तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राबवली होती, यामध्ये आदिवासी भागातील जिवती मधील तरुणांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले होते, त्यानंतर युती सरकारने सर्व आदिवासी तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन दिले.
निवडणुका झाल्या युती ची सत्ता गेली, तरीसुद्धा ते युवक नोकरीविना राहिले.
आज माजी आमदारांनी सरळ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष त्या युवकांना दिलेल्या आश्वासनाची जणू जाणीवचं करून दिली, आता त्या युवकांना नोकरी मिळेल की नाही यावर शिंदे-फडणवीस सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.