News 34 chandrapur (रमेश निषाद)
बल्लारपूर - क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय तथा तालुका क्रीडा संकुल समिती, विसापूर, बल्लारपूरच्या वतीने दिनांक 29 ऑगस्ट 2022 ला राष्ट्रीय क्रीडा दिन national sports day स्व.मेजर ध्यानचंद यांचा जयंतीनिमित्त हॉकी, मैदानी, कबड्डी,स्पर्धा आयोजित करण्यात आले. Major dhyanchand
कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी चंद्रपूर अजय गुल्हाने सर, प्रमुख पाहुणे,दीप्ती सूर्यवंशी मॅडम उपविभागीय अधिकारी,मा.डाँ, कांचन जगताप मॅडम तहसीलदार, मा.संजय राईचवर माजी तहसीलदार ,मा.अविनाश पुंड सर जिल्हा क्रीडा अधिकारी, मा.रविंद्र जी लहामागे गटशिक्षणाधिकारी ,मा.उमेश पाटील पोलीस निरीक्षक,मा.मुस्ताक सर माजी जि.क्रीडा अधीकारी, मा.कुंदन नायडू शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त,मा,राजेश नायडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त, मा जयश्री मोहूर्ले माजी शिक्षण सभापती, मा,राजू वडते सर क्रीडा अधिकारी मा.सुरेश अडपेवार मा.किशोर मोहूर्ले, मा.नरेन्द्र जी दारी, मा.प्रशांत दौनतूलवार,श्री,उमेश कडू सर,श्री,शिवाजी नागरे, मा.किशोर चिंचोळकर, श्री राजेश वाटाणे, श्री,अशोक कामळे, श्री गुरपुडे, तथा अधिकारी व पदाधिकारी, प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सकाळी 9 ला मुलांची उपस्थिती घेतली 10 वाजता ठीक उदघाटन पार पडले,सदर स्पर्धेत जवळपास 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रस्तावित पुंड सर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले प्रमुख पाहुन्यानी मुंलाना मार्गदर्शक व शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी साहेबांनी मेजर ध्यानचंद बद्दल व क्रीडा दिनाचे महत्व सांगितले, दिवसभर विविध प्रकारच्या स्पर्धा झाल्या, क्रीडा शिक्षकानी, व वयोवृद्ध माणसांनी सुध्दा या धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतला, माजी तहसीलदार मा.संजय राईचवार सर यांचा सेवानिवृत्त झाल्यामुळे तालुका क्रीडा समिती तर्फे भव्य सत्कार करण्यात आला. ठीक 4 वाजता सर्व स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रमाणपत्र, मेडल, देऊन करण्यात आले व कार्यक्रमाची वंदे मातरम म्हणुन सांगता झाली, उपस्थिती सर्वांना चहा, केळी, नास्ता व दिवसभर थंड पाणी देण्यात आले, या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन उमेश कडू सर व आभार किशोर मोहूर्ले सर यांनी मानले एकंदरीत दिवसभर मुलांनी पालकांनी पाहुण्यांनी खेळाडूनी सदर स्पर्धेचा खूप आनंद घेतला.सदर कार्यक्रम यशस्वी पने पार पाडण्यास, शिवराज भरडकर ,गुलाम अहमद ,सरोज मॅडम,बाबूलकर मॅडम,शबाना मॅडम, रोशन बुजाडे, प्रमोद रामिल्लावार,ओमप्रकाश प्रसाद,मिलिंद प्रजापती, कोठारे,हर्षद कासिंगर,रमेश नातरकी, सुधांशू मडावी,दीपक वाडके,सुनील कांबळे,डेव्हिड नार्सिस, प्रभुदास सर आदींनी प्रत्येक्ष,अप्रत्येक्ष रित्या,आपले योगदान दिले.सदर कार्यक्रमात असंख्य नागरिक उपस्थीत होते.