News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - दिनांक 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस चे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांचे ( रुक्मिणी वाडा ) निवासस्थानी व पक्ष कार्यालयात ह्या दोन्ही ठिकाणी सदिच्छा भेट दिली.
सदर भेटीत राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी ह्यांचे सोबत पुढील होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बाबत चर्चा करून स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मनोबल वाढविले. Ncp news
सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने कामाला लागून पुढील निवडणुका संपूर्ण ताकदीने लढवावे व पक्ष सदैव तुमच्या पाठीशी राहील असा संदेश त्यांनी दिला.
मूल तालुक्यातील आम्ही सर्व पदाधिकारी पक्षात एकदिलाने काम करून पक्षसंघटन मजबूत करूत असा शब्द उपस्थित स्थानिक पदाधिकारी ह्यांनी राष्ट्रवादी चे प्रदेशाध्यक्ष ह्यांना दिला.
मूल नगरपालिकेतील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चा झेंडा फडकवण्याचा सातत्याने प्रयत्न करू असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ह्यांना सुमीत समर्थ ह्यांनी दिले.
सदर सदिच्छा भेटीत उपस्थित म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, सामाजिक न्याय विभाग चे प्रदेश उपाध्यक्ष सुनील दहेगावकर, चंद्रपूरचे माजी नगरसेवक रमेश माखिजा, तालुका अध्यक्ष किसनराव वासाडे, जेष्ठ नेते निपचंद शेरकी, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, महिला तालुकाध्यक्ष सौ नीता गेडाम, महिला शहराध्यक्ष सौ अर्चना चावरे, शहर महिला कार्याध्यक्ष भाग्यश्री तागडे, प्रा.प्रभाकरजी धोटे, युवा नेते बंडू साकलवार, अनिकेत मारकवार, दुशांत महाडोळे, रितीक पोगुलवार, दिपक महाडोळे, प्रा. हरिश रायपुरे, प्रशांत भरतकर, साईनाथ गुंडोजवार, इंद्रापाल पुणेकर, गुड्डू वाढई, सतीश गुरनूले,विश्वास कोल्हे, संदिप तेलंग, बालाजी लेनगुरे, आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.