News34 chandrapur
सावली - चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात आज असोलामेंढा सिंचन तलावाच्या कालव्यात आश्रम शाळेतील काजल मक्केवार ही कपडे धुण्यासाठी आपल्या बहिणीसोबत गेली असता त्यावेळी तिचे लहान भाऊ व मेव्हणे अचानक कालव्यात बुडाले,मुलांना तलावातील खोल पाण्याचा अंदाज न लागल्याने 4 ही मुले त्या तलावात बुडाली.
भावंडाना वाचविण्यासाठी काजल ने ही तलावात उडी घेतली, सदर प्रकार नागरिकांना कळताच त्यांनी तलावाजवळ धाव घेतली, व 4 मुलांना वाचविण्यात त्यांना यश प्राप्त झाले मात्र काजल ही पाण्यात वाहून गेली. girl drowned
गडचिरोली जिल्ह्यातील चांदाळा गावातील वर्ग 6 वि मध्ये शिकणारी काजल आपल्या आई-वडिलांची भेट घेण्यासाठी 25 ऑगस्टला आली होती.
दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 ऑगस्टला काजल आपल्या बहीण, भाऊ व मेव्हण्यासोबत कपडे धुण्यासाठी आली असता भाऊ व मेव्हणे हे अंघोळीसाठी तलावात उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने 4 मुले तलावात बुडाली. An unfortunate incident
भावंड तलावात बुडत असताना त्यांना वाचविण्यासाठी काजल ने तलावात उडी मारली.
नागरिकांना याबाबत कळले असता त्यांनी तात्काळ 4 भावंडाना वाचविले मात्र काजलचा शोध लागला नाही.
वृत्त लिहेपर्यंत काजल चा शोध सुरू होता.

