News 34 chandrapur
बल्लारपूर - : जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत बल्लारपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालय अन्न व औषधी प्रशासन व पोलिसांच्या उपस्थितीत बल्लारपूर शहरातील बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, गांधी चौक, ग्रामीण रुग्णालय, पोलिस स्टेशन परिसरातील 22 पान टपरीवर धाड टाकून कोटपा कायदा 2003 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
COTPA Act 2003
सदर कारवाई राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातील जिल्हा सल्लागार डॉ. श्वेता सावलीकर यांच्या नेतृत्वात समुपदेशक श्री. मित्रांजय निरंजने, सामाजिक कार्यकर्ता तुषार रायपुरे, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता अतुल शेंदरे, अन्न निरीक्षक प्रफुल टोपणे व चमू तसेच पोलीस उपनिरीक्षक श्री. तिवारी यांनी केली. National Tobacco Control Program