News 34 chandrapur
चंद्रपूर - 2 जुलै ला शहरातील महावीरनगर येथे राहणारी 60 वर्षीय यशवंता धन्नू भागरकर ही महिला एकटी राहत होती.सदर महिला मजुरी करीत उदरनिर्वाह करीत होती, 3 जुलैला महिला घराला ताला लावून कामाकरिता बाहेर गेली होती.
महिला सकाळी घरी परत आली असताना घरातील सामान अस्तव्यस्त पडले होते, घरातील कवेलू ही काढून होते. burglary
महिलेने घरातील देवघराच्या खाली खड्डे करून दागिने लपवून ठेवले होते ते सर्व दागिने खड्डा उकरून बाहेर काढले, त्यातील सोन्याचा ऐवज एकूण किंमत 24 हजार रुपयांच्या मालावर अज्ञात चोरांनी हात साफ केला होता. Chandrapur crime
याबाबत शहर पोलिसात महिलेने तक्रार दिली, पोलीसांनी घटनेचा तपास सुरू केला करीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराबाबत माहिती काढली.
मात्र अनेक दिवस उलगडल्यावर सदर चोरीच्या गुन्ह्यात आरोपीबद्दल माहिती मिळाली नाही.
तब्बल 1 महिन्यानंतर पोलिसांना एक इसम सोने विकण्याकरिता सराफा बाजार मध्ये फिरत असल्याची माहिती मिळाली.
गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सपोनि जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी सराफा लाईन गाठत 33 वर्षीय बाबा खान रुस्तम खान पठाण व गणेश धन्नूलाल ढेकलेवाले दोन्ही रा. महावीरनगर यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. Sp chandrapur
दोन्ही आरोपिकडून आजच्या दरानुसार एकूण 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि जयप्रकाश निर्मल यांच्या नेतृत्वाखाली विलास निकोडे आदींनी यशस्वीपणे पार पाडली.