News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांच्या केबिन मध्ये आज दुपारी एका तरुणाने चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने स्थानिक महापालिका आयुक्त कार्यालयात एकच खळबळ उडाली. A knife came out in the municipality
दुपारी 2 वाजता आयुक्त राजेश मोहिते आपल्या कक्षात बसले असताना ही घटना घडली, त्याचवेळी त्यांच्या केबिनमध्ये एक तरुण घुसला आणि त्यांनी आयुक्त मोहिते यांच्याशी जोरजोरात वाद घालण्यास सुरुवात केली. तो काय ओरडत होता हे केबिन बाहेरील नागरिक व कर्मचा-यांना कळले नाही. Municipal commissioner
या वादावादीत तरुणाने खिशातून चाकू काढला आणि कोणाला काही समजण्यापूर्वीच त्याने पोटात वार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या पोटावर चाकूने 3 वार केले. केबिनमधून मोठा आवाज ऐकून एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात उभा असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकांनी केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. Chandrapur municipal corporation
लक्ष्मण राजेंद्र पवार असे जखमी तरुणाचे नाव असून, हा तरुण वय 38 असून तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत सध्या पालिका अधिकारी काहीही सांगण्यास तयार नसल्याने खुद्द आयुक्त मोहिते यांचा मोबाईल स्वीच ऑफ येत होता. या घटनेबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या तरुणाने आत्महत्येचा हा प्रयत्न का केला? याचे कारण शोधण्याचा प्रयत्न शहर पोलिस करत आहेत.
पोलिस करीत आहे.