News 34 chandrapur
चंद्रपूर : द एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटी संचलित इंदिरा गांधी गार्डन स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. राधा आणि कृष्णाच्या वेषभुषा परिधान करून गोंडस चिमुकल्यांनी संपूर्ण उत्सवाला पारंपारिक स्पर्श दिला. लहान मुलांनी जन्माष्टमीच्या गाण्यांच्या तालावर जन्माष्टमीच्या गाण्यांवर नृत्य प्रस्तुत करून उपस्थितांचे मने जिंकली.
Janmashtami 2022
द एज्युकेशन अँड कल्चरल सोसायटीचे सचिव कृष्णन अय्यर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे पर्यवेक्षण उपमुख्याध्यापिका पायल कोम्मुरू यांनी केले. पारंपारिक दीपप्रज्वलन आणि भागवत गीतेच्या श्लोकांच्या पठणाने उत्सवाची सुरुवात झाली.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्गातील मुली आणि मुलांनी वेग वेगळ्या शास्त्रीय नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पारंपारिक राधा आणि कृष्णाच्या पोशाखात प्री-प्रायमरी Pre-primary विभागातील मुलांनी रॅम्प वॉक करून Ramp walk आपल्या पालकांना मोहून घेतले. कार्यक्रमाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे “दहीहंडी” पारंपारिक वेशभूषा परिधान केलेल्या मुला-मुलींच्या हातून फोडण्यांत आली.
Dahi handi 2022
यावेळी शाळेचे कॅबिनेट प्रतिष्ठापन प्रमुख पाहुणे कृष्णन अय्यर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयात घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धा, राखी निर्माण, फॅन्सी ड्रेस, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण पाहुणे व उपमुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Indira gandhi garden school chandrapur
शाळेच्या कॅबिनेट सदस्यांनी या कार्यक्रमाचे संचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

