News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे व्यवसायिकांची मोठी भरमार आहे, सुगंधित तंबाखू ची तस्करी असो की रेती ची, कोळसा माफिया असे अनेक नाव न संपणारे तस्कर आपल्या जिल्ह्यात आहे.
जुगार बहाद्दर यांना खुनातील आरोपीने 15 ऑगस्टला चंद्रपुरातून आपल्या साथीदारांसह अपहरण करीत त्यांचेकडून 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली, मात्र अपहरणकर्त्यांचा बेत फसल्याने आरोपी पोलिसांच्या रडारवर आले आहे. Chandrapur crime
महाकाली वार्ड चंद्रपूर येथील रहिवासी प्रदीप गंगमवार व महाकाली कॉलरी येथे राहणारे राजेश झाडे हे दोघेही लहापणीचे मित्र असून यांना जुगार खेळण्याचा अतोनात छंद आहे.
पोलिसांनी जुगार खेळताना पकडू नये यासाठी हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी जुगार खेळतात.
हा जुगाराचा छंद त्यांच्या जीवावर स्वातंत्र्य दिनी चांगलाच बेतला. Kidnapping
जुगाराच्या या छंदात त्यांची ओळख खुनाच्या आरोपात 10 वर्षे शिक्षा भोगलेला सरताज हाफिज यांच्यासोबत झाली होती.
जुगार खेळण्यात झालेला मित्रचं त्यांच्या जीवावर उठला. Betting players
प्रदीप गंगमवार यांच्याजवळ असलेली चारचाकी त्यांना चालवीता येत नसल्याने त्यांचा बालपणाचा मित्र राजेश झाडे त्यांच्या वाहनाचा सारथी होता.
15 ऑगस्टला चंद्रपुरात मुसळधार असल्याने गंगमवार आपल्या घरी होते त्याचवेळी राजेश यांनी बाहेर जुगार खेळायला जाऊया असे फोनवरून सांगितले. Extortion
मात्र त्याचवेळी सरताज यांनी कॉल करून मला पण जुगार खेळायचा आहे असे सांगितले.
त्यांनतर पावसात तिघेही जुगार खेळण्यासाठी निघाले, तुकुम ला पोहचल्यावर गाडी पार्क करीत असताना अचानक 4 अनोळखी इसमानी गाडीत प्रवेश करीत तिघांना चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवीत धमकविले. Abduction of gamblers
मग चारचाकी वाहनात सुरू झाला अपहरणाचा प्रवास, त्या अनोळखी इसमांनी बंदुकीचा धाक दाखवीत गंगमवार याना 3 कोटी रुपयांची खंडणी मागितली.
मात्र इतके पैसे नसल्याने त्यांनी हतबलता दाखवली असता राजेश झाडे हे मध्ये बोलल्याने एकाने त्यांच्या कानशिलात लगावली. Chandrapur police
गंगमवार यांनी 50 लाख रुपये देण्याची तयारी दाखवली यासाठी त्यांनी यवतमाळ येथील मित्राला फोन केला.
मात्र पैसे 16 ऑगस्टला मिळेल असे सांगितले असता त्या 4 आरोपीनी वाहन मूल मार्गे सिंदेवाही, नागभीड व उमरेड मार्गे थेट नागपूर पोहचले. Ransom
वाटेत उमरेडला पोहचल्यावर चार पैकी 1 त्याठिकाणी उतरला, नंतर गाडी पहाटे 3 च्या सुमारास मोमीनपुरा येथे दाखल झाली, तिघांपैकी एकाला सिगारेट पिण्याची तलब आली, गाडी थांबविण्यात आली, पण गाडी त्यावेळी अनलॉक होती, याचा फायदा घेत राजेश झाडे हा गाडीच्या खाली उतरत वाचवा, वाचवा ओरडू लागला नागरिक राजेश कडे धावले. The fear of the gun
नागरिकांची गर्दी जमा होत असताना आरोपीने राजेश ला पकडण्याचा प्रयत्न केला, हातापायी सुद्धा झाली मात्र त्यावेळी मोमीनपुरा येथे पोलीस असल्याने त्यांनी तात्काळ राजेश ला सोडविले, अपहरणाचा कट फसला असे वाटताच आरोपीनी तिथून पळ काढला त्यांच्यासोबत सरताज ने ही पळ काढला.
पोलिसांनी तात्काळ राजेश व प्रदीप ला पोलीस ठाण्यात आणून विचारपूर केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला.
पोलिसांनी प्रदीप गंगमवार यांच्या तक्रारीची नोंद घेत सदर प्रकरण दुर्गापूर पोलीस स्टेशन चंद्रपूर कडे वर्ग केले.
अपहरण व खंडणीच्या कटामागे सरताज असल्याची जाणीव प्रदीप ला झाली, आरोपीनी ज्यावेळी घटनास्थळवरून पळ काढला त्यावेळी गाडीत 2 मोबाईल, बंदूक व गुप्ती आढळली त्या सामानाची चौकशी केली असता ते सरताज हाफिज याचे च असल्याचे स्पष्ट झाले.
प्रदीप गंगमवार यांच्या तक्रारीवरून विविध कलमांव्ये गुन्हा दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला असून सदर प्रकरणाचा तपास दुर्गापूर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. Kidnapping plan
मात्र भर दिवसा बंदुकीच्या धाक दाखवीत अपहरणाचा प्रकार जिल्ह्यात प्रथमचं घडला आहे.
या अपहरणाचे सर्व सूत्र नागपुरातून जुळले असल्याची दाट शक्यता असून सदर प्रकरणात आरोपींची संख्या वाढणार असल्याची माहिती आहे, खंडणी मिळाल्यावर दोघांना मारण्याचा डाव असल्याची शक्यताही नाकारता येत नाही.