चंद्रपूर - निम्न वर्धा धरण, इरई धरण व गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुन्हा शहरातील काही भागात पाण्याचा शिरकाव झाल्याने नागरिकांना पुन्हा समस्यांचा सामना करावा लागत आहे. Flood 2022
मुसळधार पावसाला ब्रेक लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला होता मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने शहरातील बिनबा गेट बाहेर इरई नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाल्याने शांतीधाम समोरील पुलावरून पुन्हा पाणी वाहू लागल्याने ग्रामीण भागात जाणारा मार्ग बंद झाला.
सिस्टर कॉलोनी, नगीनाबाग व रहमतनगर परिसरात काही प्रमाणात पाणी वाढले आहे. Chandrapur flood situation
चंद्रपूर मनपाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याने नागरिकांनी आधीच सावध पवित्रा घेत सुरक्षित ठिकाणी थांबले त्यामुळे पुराच्या पाण्याचा फटका कुणाला बसला नाही.