News 34 chandrapur
भद्रावती : सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे भद्रावती व वरोरा तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला असुन घरांमधे पाणी शिरले आहे. Flood 2022
अशा परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे व त्यांना भोजन व्यवस्था पुरविण्याचे कार्य प्रशासन करीत आहे. या कार्यात प्रशासनाला स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट मदत करणार असुन भद्रावती तालुक्यातील श्री मंगल कार्यालय पूरग्रस्तांच्या निवासाकरीता उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे व त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील तिथेच केल्या जाणार असल्याचे कळविण्यात आले आहे. Chandrapur flood
याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष रवी शिंदे यांनी भद्रावतीचे तहसीलदार सोनावणे व वरोरा चे तहसीलदार मकवाने यांच्याशी संपर्क साधुन पूरग्रस्तांना निवास व भोजनव्यवस्था करण्यास ट्रस्ट तयार असल्याचे सांगितले आहे. Flood situation
वेळप्रसंगी प्रशासनाच्या हाकेने वरोरा येथेही निवासाची व जेवनाची व्यवस्था करण्याचे आश्वासन वरोरा तहसिलदार यांना शिंदे यांनी दिले आहे.
मागील अनेक दिवसांच्या संततधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आलेला आहे या पुराचा वेढा भद्रावती तालुक्यातील चारगाव, पिपरी, कोच्ची गावांच्या सभोवताल झालेला आहे. या गावांचा तालुक्याशी वाहतूक संपर्क तुटला आहे. पिपरी गावातील घरामध्ये पाणी गेलेले आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून चारगाव येथील नागरिकांना एकता नगर कॉलनी डब्ल्यूसीएल येथे शिफ्ट करण्यात येत आहे. माजरी कॉलरी येथील दोन वार्डामध्ये पाणी शिरलेले आहे. पळसगावची सुद्धा परिस्थिती बिकट आहे. संततधार पावसामुळे पाणी वाढत चालले आहे. अशा परिस्थितीत पूरग्रस्तांना मदतीचा हात म्हणून ट्रस्ट धावून आली आहे. ट्रस्टचे कार्यकर्ते या भागात फिरुन मदतकार्य राबवित आहे. सातत्याने कार्यकर्ते व पदाधिकारी गाव खेळ्यातील प्रमुखांच्या व प्रशासनाच्या संपर्कात आहेत. Shinde's initiative to help
पुरामुळे निर्माण होणारी परिस्थिती बिकट असते. वन्यजीव, सरपटणारे प्राणी, विषारी जीवजंतू आदींचा संचार वाढतो, रोगराई पसरते, त्यामुळे गावकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे रवि शिंदे यांनी म्हटले आहे.
यासाठी पुरग्रस्तांनी वरोरा तालुक्यात दत्ता बोरीकर, खेमराज कुरेकर पवन महाडीक, राहुल बलकी, सुधाकर बुरान व भद्रावती तालुक्यात जि. प. सदस्य, प्रवीण सुर, पं. स. सदस्य नागोराव बहादे, कृउबास सभापती वासुदेव ठाकरे, भास्कर ताजने, अनुप खुटेमाटे, रोहन खुटेमाटे, विश्वास कोंगरे, धनु भोयर, अक्षय बंडावार, सतीश वरखडे, प्रदीप देवगळे, संदीप खुटेमाटे, प्रवीण आवारी, अशोक मारेकर, भूमेश वालदे, यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.