News 34 chandrapur
घुग्घुस - 18 जुलै ला निम्न वर्धा धरणाचे दरवाजे उघडल्याने अनेक गावांत पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. Flood 2022
घुग्घुस जवळून 16 किलोमीटर अंतरावर असलेले बेलसनी गावात वर्धा नदीचे पाणी शिरल्याने अख्खा गावचं पाण्याच्या विळख्यात आला. Maharashtra flood update
बेलसनी गावात पाणी शिरल्याची माहिती मिळताच तात्काळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व चंद्रपूर पोलीस बचाव पथकाने मोर्चा सांभाळत बोटीच्या साहाय्याने गावातील नागरिकांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. सध्या पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने गावातील चारही बाजूने पुराच्या पाण्याने वेढा घातला असून कोणत्याही क्षणी गाव पाण्यात जाण्याची शक्यता आहे. Chandrapur flood
आतापर्यंत तब्बल 500 नागरिकांना मुरसा या गावी स्थलांतरित करण्यात आले आहे. गावातील शेतकऱ्यांचे संपूर्ण शेत पाण्याखाली आले आहे.
गावात अजूनही 100 च्या जवळपास नागरिक अडकल्याची माहिती आहे. Rescue operation
सावधानता म्हणून प्रशासनाने घुग्घुस - वणी मार्गावरील बेलोरा पूल पूर्णतः बंद करण्यात आला.
नागरिकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचे काम बचाव पथक प्रमुख अशोक गरगेलवार, मंगेश मत्ते, वामन नक्षीने, सुजित मोगरे, अतुल चहारे, दिलीप चव्हाण, उमेश बनकर, अजित बाहे यांनी यशस्वीपणे पूर्ण केले.