News 34 chandrapur
वरोरा - जनप्रतिनिधी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो एखाद्या पांढऱ्या शुभ्र रंगाचा कापड घातलेला नेता, मात्र आज सर्व चित्र बदलले आहे, कपड्यापेक्षा स्वभावाला अधिक महत्व दिले जाते, अश्यातच चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील माजी खासदार यांचा संवेदनशीलपणा बघून नागरिकही भारावले.
वाराणसी दौऱ्याहून परतत असतांना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी खांबाडा मार्गे थेट वरोरा तालुक्यातील पूरप्रभावित दिंडोरा, बाम्बर्डा, सोइट या गावांना भेटी देऊन पुरप्रभावित ग्रामस्थांशी चर्चा केली. Hansraj ahir
त्यांच्या अडचणी व तक्रारी ऐकून घेतल्या. पुरामुळे उध्वस्त झालेल्या शेतपिकांची व प्रभावित घरांची सुद्धा त्यांनी पाहणी केली. Chandrapur flood
या परिसरात बचाव कार्य करणाऱ्या SDRF चमूशी संवाद साधत त्यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. या सर्व गावातील पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविल्यानंतर त्यांच्या राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था केल्याबद्दल अहीर यांनी रचना कन्स्ट्रक्शन कंपनीच्या या सामाजिक कार्याचे कौतुक करीत आभार मानले.
पूरग्रस्त भागात नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देत प्रशासनातील अधिकाऱ्यांना सदर बाब सांगितली व तात्काळ मदत पोहचविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. Flood 2022
यावेळी अहीर यांच्यासमवेत भाजयुमो चे प्रदेश सचिव करण देवतळे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, विजय मोकाशी, शेखर चौधरी, सुधीर भामट, बाळू भोयर यांचेसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. Maharashtra flood update