चंद्रपूर - 8 जुलै ला सायंकाळी वाजताच्या सुमारास शहरातील माता नगर चौक लालपेठ येथे राहणारे 37 वर्षीय सतीश नगराळे या युवकाचा रक्ताच्या थारोळ्यात राहत्या घरी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.
Chandrapur murder
Chandrapur murder
शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर तात्काळ घटनास्थळ गाठत त्यांनी तपास सुरू केला.
फॉरेन्सिक टीम ने ही तांत्रिक तपास सुरू केला होता.
पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे व गुन्हे शोध पथकाचे सपोनि जयप्रकाश निर्मल यांनी तपासाला गती दिली. Brutal crime
पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला, मृतक सतिशचा लहान भाऊ 30 वर्षीय संतोष नगराळे याने आपल्या भावाला ठार केले होते.
घरगुती वादात दोघा भावात भांडण झाले, या भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाल्याने संतोष ने चाकू काढत सतीश च्या छातीवर 15 ते 16 वार करीत त्याला ठार केले.
रक्तबंबाळ झालेला सतीश जागीच मरण पावल्याने संतोष तिथून पसार झाला.
शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. Chandrapur police
सध्या आरोपी संतोष पोलीस कोठडीत आहे, पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

