News 34 chandrapur
गोंडपिपरी :– चंद्रपूर जिल्ह्यात 8 जुलै च्या रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, दुसऱ्या दिवशी 9 जुलै ला सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे विजेचा कडकडाट व्हायला लागला. Zp chandrapur school
गोंडपीपरी तालुक्यात राळापेठ येथील सुरू असलेल्या जिल्हा परिषद शाळेवर अचानक वीज कोसळल्याने परिसरात मोठा स्फोट झाला की काय असा आवाज आला. The heavy rain
सकाळी शाळेचा वर्ग सुरू असताना ही घटना घडली, यावेळी चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अमर माधव राऊत, सातव्या वर्गात शिकणारी राशी विनायक ताजने ब निशांत अंगुलमान उराडे हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले, सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. Lightening
या घटनेमुळे शाळेतील विद्युत उपकरने, पंखे, लाईट व टीव्ही जळून खाक होत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.
तर दुसऱ्या घटनेत चिंचेच्या झाडावर वीज कोसळली.
विठ्ठलवाडा येथे चिंचेच्या झाडावर वीज कोसळली पुंजाराम पिंपळकर यांचे शेत गावालगत आहे झाडाजवळ खोपडीत त्यांनी सुरक्षित ठिकाणी शेती उपयोगी साहित्य ठेवले होते. Lightning fast
अचानक वीज कोसळल्याने यांचे पाइप 20 नग,30 बॅग खत ,शेती अवजार एकंदरीत अंदाजे 40 हजाराचे नुकसान झाले.