चंद्रपूर - 19 डिसेंबर 2021 ला बाबूपेठ बायपास मार्गावरील असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर मद्यपी युवकांनी चारचाकी वाहन बेधुंद सुसाट चालविले होते, मात्र चारचाकी वाहनवरील नियंत्रण सुटल्याने वाहन सरळ पुलाचे कठडे तोडत खाली आदळली. Four-wheeler uncontrolled
या अपघातात 2 युवकांचा मृत्यू झाला होता, मात्र त्यानंतरही ते कठडे तसेच ठेवण्यात आले, प्रशासनाने कठडे दुरुस्त केले नाही. Accident recurrence
तब्बल 7 महिन्यांनी त्या घटनेची म्हणजेच 9 जुलै ला सायंकाळच्या सुमारास पुनरावृत्ती टळली.
एक युवक बेधुंद व अति मद्य प्राशन करीत भरधाव वेगात त्या उड्डाणपुलावरून जात असताना वाहनावरील त्या युवकाचा ताबा सुटला आणि पुलाच्या अपघातग्रस्त कठड्याला ते वाहन आदळले.
मात्र वाहनातील car AIRBAG निघाल्याने त्या युवकाचे प्राण वाचले.
अपघात होताच ते वाहन कठड्याला अडकून होते, नागरिकांनी तात्काळ ते वाहन मागे खेचले, या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Flyover accident
अति मद्य प्राशन करून तो युवक स्वतःचा व नागरिकांच्या जीवाशी खेळायला निघाला होता, मात्र वाटेतच त्याचा अपघात झाला.
प्रशासनाने उड्डाणपुलावरील ते कठडे दुरुस्त करावे अन्यथा एक दिवस मोठा अपघात त्या जागी होणारं.
चंद्रपूर पोलीस व वाहतूक विभागाने अश्या मद्यपी युवकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहे.