News 34 chandrapur
चंद्रपूर - महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद चंद्रपूर जिल्हा ग्रामीण चे जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर यांच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांनी एका महिला संघटनेला हाताशी धरून खोटी तक्रार दाखल केली.
याचा निषेध करण्याकरिता आज दिनांक २० जुलै २०२२ ला चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद समवेत विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जिल्हा परिषद चंद्रपूर चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना खोट्या तक्रारीबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातील सखोल उच्चस्तरीय चौकशी करून सत्यता बाहेर आणावी व दोषींवर कडक कारवाई करावी या संदर्भातले निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या प्रामुख्याने उपस्थित होत्या. Zilla parishad chandrapur
जिल्हा परिषद चंद्रपूर येथील शिक्षण विभागात अनेक वर्षापासून शिक्षक कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागत असून त्यांना कर्मचारी व अधिकाऱ्याकडून योग्य न्याय मिळविण्यास अडचण जात आहे. Teacher union
मागील १६ वर्षापासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर हे संघटनेच्या माध्यमातून अन्यायग्रस्त शिक्षक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरिता प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहे.
परंतु काही भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना त्यांचा काटा काढायचा होता म्हणून त्यांनी एका महिला संघटनेला हाताशी धरून गिरडकर सरांवर खोटे आरोप करून त्यांचे चारित्र्य हनन करण्याचा निंदनीय प्रकार केला आहे.
अशा खोट्या तक्रारीमुळे संघटनेच्या कार्यावर व निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल खचवण्याचा प्रयत्न अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांकडून केला गेला, त्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराची सखोल याची उच्चस्तरीय चौकशी करून सत्यता जनतेसमोर आणावी अशी मागणी चे निवेदन अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत आज माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांना विविध संघटनेच्यां वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
विनोद पिसे जिल्हा सचीव, मुख्याध्यापक संघ चंद्रपूर, अरविंद राऊत जिल्हा कोषाध्यक्ष, जिवतोडे सर संघटक मुख्या.संघ चंद्रपुर, मारोती पाटील अध्यक्ष प्रजासत्ताक शिक्षक संघ चंद्रपूर,श्री नंदेश्वर सर उपाध्यक्ष प्रजासत्तक शिक्षक संघ, विनोद पाढंरे उपाध्यक्ष नागपुर विभाग, मधुकर मुप्पिडवार अध्यक्ष म.रा.शि.प.चंद्रपूर, विलास खोंड कोषाध्यक्ष,श विवेक आंबेकर जिल्हा कॉन्व्हेंट प्रमुख चंद्रपुर, संध्या गिरडकर जिल्हा महीला आघाडी प्रमुख चंद्रपुर, सौ सरीता सोनकुसरे जिल्हा अध्यक्ष प्राथमिक, सौ रोहीणी वरभे कोषाध्यक्ष, सौ करुणा ठाकुर जिल्हा सहकार्यवाह,श्री वसंत वडस्कर सर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, श्री गजानन शेळके उपाध्यक्ष, श्री मनोहर झोडे उपाध्यक्ष,सौ मगंला डांगरे, सौ बंडीवार मॅडम ,सौ गुंडावार मॅडम,श्री पेचे सर,श्री विनय कावलकर,दिपक वाघे सर,श्री विलास भागडकर सर,श्री रेवस्कर सर,श्री भाडांरकर सर,श्री बोरकर सर,श्री धारणे सर, श्री चवले सर,श्री मुनीराज कुथे सर सर्व जिल्हा पदाधिकारी,तालुका अध्यक्ष/कार्यवाह म.रा.शि.प.चंद्रपुर (ग्रामिण), मुख्याध्यापक संघ चंद्रपुर, प्रजासत्ताक शिक्षक संघ चंद्रपुर इत्यादी च्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.