News 34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते, आतापर्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेले आणि पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रीय असणारे राकेश भाऊ अलोने यांची शिवसेना तालुका प्रमुखपदी (प्रभारी) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या सहा -सात महिन्यांपासून नेतृत्त्वाशिवाय प्रवास करत असलेल्या सिंदेवाही शहर शिवसेनेला अखेर नेृतत्त्व मिळाले आहे. Shivsena chandrapur
हिंदूह्रयुदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांच्या सुचनेनुसार व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम,विधानसभा संपर्क प्रमुख अशोक सकपाळ यांचा सहमताने राकेश अलोने यांची सिंदेवाही तालुका प्रमुख(प्रभारी) या पदावर नियुक्ती केली आहे. Shivsena news
गेल्या काही वर्षांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील व शहर शिवसेनेची कामगिरी घसरल्यानेच प्रमुखांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्या वरूण नव्याने सिंदेवाही तालुका प्रमुख पदावर राकेश भाऊ अलोने यांची नियुक्ती करून शहर शिवसेनेला बळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
सिंदेवाही तालुका प्रमुख पदावर राकेश भाऊ अलोने नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे सिंदेवाही तालुक्यात व शहरात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.