News 34 chandrapur
वरोरा/भद्रावती : दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन विस्कळीत झाले होते व यावर्षी महापुर आल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. पाणी हेच जीवन म्हणुन समजल्या जाते. मात्र आता हेच पाणी जीव घेत आहे, अशी परिस्थिती सर्वत्र झाली आहे. Ravi shinde
नदीकाठची गावे पुराच्या पाण्यात आली आहेत. रहिवाश्यांच्या घरात पाणी शिरले आहे. शेतपीक पाण्यात खरवडून गेले आहे. घरातील धनधान्यासकट, इलेक्ट्रिक व इतर सर्वच वस्तू खराब झाल्या आहेत. घरदार सोडून नागरीक अन्न व निवारा शोधत आहे. प्रशासनाची देखील मदतकार्य राबविताना दमछाक होत आहे. अशा कठीण प्रसंगी जो धावून येतो, तोच खरा देवमाणूस असतो. Flood 2022
आधी कोरोना प्रादुर्भावाच्या काळात निःशुल्क कोविड केअर सेंटर सुरु करुन व आता पूरग्रस्तांना अन्न व निवारा पुरवून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्टद्वारे मानवसेवेचे कार्य केल्या जात आहे. Chandrapur flood 2022
रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनात ट्रस्टच्या वतीने पूरग्रस्तांना चहा, नाश्ता, भोजन, पाण्यांच्या कॅन व जिवनावश्यक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे. सोबतच त्यांची निवास व्यवस्थासुध्दा करण्यात आली आहे. ट्रस्टचे कार्यकर्ते पुरग्रस्तांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे प्रयत्न करीत आहे. पुरामुळे माजरी या गावातील आवागमन बंद झाल्याने माजी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना ट्रस्टचे अध्यक्ष रवि शिंदे यांनी विनंती करुन काही रेल्वेगाड्यांचा थांबा मिळवून घेतला व या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून भोजनाचे पॉकेट पाठविल्या जात आहे. Hansraj ahir
रविंद्र शिंदे यांनी भद्रावती येथील स्वतःच्या मालकीच्या श्रीमंगल कार्यालयात पुरग्रस्तांची निवास व भोजन व्यवस्था केली आहे. कोंढा येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कॅन पुरविण्यात आल्या. माजरी येथील पुरग्रस्तांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली. माजरी येथे ट्रेनमधून गरजूंना जिवनावश्यक साहित्य पुरविल्या जात आहे. चारगाव व चिरादेवी येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्यास मदत करण्यात आली. Aid to flood victims
माजरी, पाटाळा कुचना, राळेगाव पळसगाव व चालबर्डी या गावातील पुरपिडीतांना जि. प. सदस्य प्रविण सुर यांच्या नेतृत्वात ट्रस्टचे कार्यकर्ते परिपूर्ण सहकार्य करीत आहे. Active leader
शेंबळ, करंजी व तुळाणा येथील नागरिक निवाऱ्याकरीता वरोरा येथील साई मंगल कार्यालयात पोहचले असता येथे ट्रस्ट तर्फे भोजन, नाश्ता, चहा, बिस्किट वितरीत करण्यात आले. यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सुध्दा ट्रस्टला सहकार्य लाभले.Trains stopped
या कार्यात प्रशासनाच्या वतीने भद्रावतीचे तहसीलदार अनिकेत सोनवणे, वरोराच्या तहसीलदार रोशना मकवाने यांच्यासह गटविकास अधिकारी व तलाठी यांचे वेळोवेळी सूचनेनुसार ट्रस्ट तर्फे मदतकार्य सुरु आहे.
ट्रस्ट तर्फे वरोरा तालुक्यात दत्ता बोरीकर, खेमराज कुरेकर, नर्मदा बोरीकर पवन महाडीक, राहुल बलकी व सुधाकर बुराण, रोशन खाडे, विनोद कोकाडे, प्रवीण गंधारे, संतोष काकडे, स्विय सहायक युवराज इंगळे, भद्रावती तालुक्यात माजी जि. प. सदस्य प्रवीण सुर, माजी .पं. स. सदस्य नागो बहादे, कृउबास सभापती वासुदेव ठाकरे, रमेश मेश्राम, वसंता मानकर, भास्कर ताजने, अनुप खुटेमाटे, रोहन खुटेमाटे, विश्वास कोंगरे, धनु भोयर, अक्षय बंडावार, सतीश वरखडे, प्रदीप देवगडे, संदीप खुटेमाटे, प्रवीण आवारी, अशोक मारेकर, कपिल रांगणकर, प्रफुल ताजने, भरत वांढरे, रवि राय, रवि भोगे व भूमेश वालदे आदी प्रकल्पग्रस्तांसाठी सहकार्य करीत आहे .
यांच्यासह अनेक कार्यकर्ते ट्रस्टच्या आवाहनाला प्रतिसाद देत असून सहकार्य करीत आहे.