चंद्रपूर - राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे विरोधात बंड पुकारून आमदार फोडत मुख्यमंत्री बनले. Chandrapur shivsena
त्यानंतर अनेक आमदार, स्थानिक पदाधिकारी व आता 12 खासदार शिंदे यांनी आपल्या गुटात सामील केले. Shivsena
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात शिंदे गट उभारावा यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहे. Shinde group
चंद्रपुरात शिंदे यांचे विश्वासू पांडव हे शिंदे गटात शिवसेना व माजी पदाधिकाऱ्यांना सामील करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात बैठकही घेणार होते मात्र काही कारणास्तव ती बैठक रद्द झाली. Rebal eknath shinde
मात्र आता चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली 21 जुलैला शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिज्ञापत्रावर आम्ही पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहणार असा मजकूर लिहत शपथ घेतली. Thackeray group
शिंदे यांच्या बंडानंतर चंद्रपुरातही शिवसेनेत चित्र पालटेल अशी अवस्था होणार काय? असा प्रश्न अनेक पदाधिकारी यांच्यासमोर निर्माण झाला होता मात्र जिल्हाप्रमुख गिर्हे यांचा उध्दव ठाकरे यांच्यावर असलेला विश्वास कायम ठेवत आम्ही सदैव पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत राहणार अशी प्रतिक्रिया गिर्हे यांनी दिली.