News 34 chandrapur
भद्रावती :- चंद्रपूर जिल्ह्यातील हृदयद्रावक पूर परिस्थितीत अधिकारी वर्गाची असंवेदनशीलता पुढे आल्याने आ. सुधीर मुनगंटीवार यांचा झालेला संताप पुढे आला आहे.
ग्रामस्थांची विचारपूस करण्यासाठी पोहचलेल्या आ. मुनगंटीवार यांचा रुद्रावतार व्हायरल झालाय. Viral पुराची सर्वाधिक झळ पोचलेल्या भद्रावती तालुक्यातील पळसगाव येथे मदत नाकारणाऱ्या वेकोलि अधिकाऱ्याची त्यांनी कानउघाडणी केली. ग्रामस्थांनी सुरक्षित स्थळ म्हणून वेकोलिचे सभागृह मागितले होते. मात्र ते देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. Flood 2022 काही तासात मदत पोचवा अन्यथा हिशोब करतो हा मुनगंटीवार यांचा व्हिडिओ वायरल viral video झालाय.
मुनगंटीवार यांनी ग्रामस्थांना वेकोली विरोधात पोलीस तक्रार करण्यास सांगितले, तुमच्या परवानगीशिवाय वेकोली मातीचे ढिगारे टाकते तरी कसे? संविधानातील आपल्या हक्काचा वापर करा.