News 34 chandrapur
मूल (गुरू गुरनुले) : शेतामध्ये उभा असलेल्या विद्युत खांबावर करंट असल्याने त्याच खांबाला जनावरांना करंट लागल्याने चार जनावरे जागीच ठार झाल्याची घटना मूल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथे दि. 21 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता दरम्यान घडली. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मूल तालुक्यातील मौजा बोरचांदली येथीज घरोघरी असलेल्या जनावरांना चराईसाठी मूल-बोरचांदली मार्गावर गुखांनी आले होते, जवळपास दिडशे जनावरे चराई करीत असताना मूल येथील गोयल नामक इसमाच्या शेतामधील विद्युत खांबावर कंरट असल्याने त्याच खांबाचा जवळील 5 जनावरांचा करंट लागला, त्यातील महेश कटंकमवार यांचा 1 बैल आणि 1 म्हैस, विनायक पुपरेड्डीवार यांची 1 गाय, संजय कुटांवार आणि नितीन कुंटावार यांची प्रत्येकी 1 गाय ला करंट लागली, यापैकी 1 बैल आणि 3 गाय ठार झाले तर सुदैवाने महेश कंटकमवार यांची 1 म्हैस या दुर्घटनेतून बचावली.
Electric pole shock
ऐन पावसाचा हंगाम सुरु असतानाच शेतकऱ्यांच्या जनावरांवर अशा प्रसंग ओढावल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असुन हजारो रुपयाचे नुकसान झालेले आहे, सदर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी मागणी होत आहे.
घटनास्थळावर विज वितरण कंपनी, पोलीस प्रशासन आणि महसुल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी पोहचुन पंचनामा केला.