News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - मूल तालुका जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यांचे आरक्षण आज जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्यांचे आरक्षण हे चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण हे मूल तहसिल कार्यालयात काढण्यात आले.
Chandrapur zilla parishad reservation
Chandrapur zilla parishad reservation
गननिहाय आरक्षण जाहीर झाल्यांने आता इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागणार असून हालचालींना वेग येणार. सर्वच पक्षाचे राजकीय नेते कामाला लागतील आणि संभाव्य उमेदवारही राजकीय नेत्यांकडे आप आपली तिकीट पक्की करण्यासाठी धाव घेतील. अशी चर्चा पंचायत समिती आवारात केली जात आहे. Political reservation
मूल तालुक्यात चार जिल्हा परिशद सदस्य संख्या असून, त्यात चिखली चिचाळा (अनुसूचित जमाती ), सुशी दाबगांव (सर्वसाधारण महिला) बेंबाळ जुनासुर्ला (नागरीकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण) मारोडा राजोली (अनुसूचित जाती महिला) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
तर पंचायत समिती सदस्य पदासाठी राजोली क्षेत्र (सर्वसाधारण महिला), मारोडा (सर्वसाधारण), चिखली (अनुसूचित जमाती महिला), चिचाळा (सर्वसाधारण महिला) चिरोली (सर्वसाधारण) सुशी दाबगांव (नागरीकांचा मागास प्रवर्ग) जुनासुर्ला (सर्वसाधारण महिला) बेंबाळ (अनुसूचित जाती) असे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदाकरीता मागील काही दिवसांपासून तयारीला लागलेल्या काही संभाव्य उमेदवारांचा हिरमोड झाला तर काहींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.