news 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - मौजा कोसंबी येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील गावांचे सुक्ष्म नियोजन करुन दहा वर्षांचे नियोजन आखून ग्रामीण भागातील, शेतकरी, मंजूर व्यावसायिक व भुमिहीन कुटुंबांना लखपती करण्याच्या उद्देशाने मागेल त्याला काम या उक्तीप्रमाणे दशवार्षीक नियोजन तयार करण्यात आलेला आहे.
मी समृद्ध तर गाव समृद्ध पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना साध्य करायची आहे. या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना _ महाराष्ट्र. नविन नियुक्त APO/PTO/CDEO यांना एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन ग्रामपंचायत कोसंबी येथे करण्यात आले. या प्रशिक्षणाला उपस्थित रविंद्र किसन कामडी सरपंच ग्रा.पं.कोसंबी, जयंत टेंभुरकर जिल्हा MIS समन्वयक जि. कार्यालय चंद्रपूर, सतिश वनकर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पं स.मुल,सुरज आकनपल्लीवार ग्रामसेवक ग्रामपंचायत कोसंबी, प्रज्ञामित्र नगराळे APO पं स.मुल, श्वेता पिपरे PTO बल्लारपूर,पायल मेश्राम CDEO ब्रम्हपुरी, कल्याणी बल्की APO चंद्रपूर, जितेंद्र गद्देकार APO मुल,श्याम पुट्टावार PTO मुल, बोंदगुलवार PTO मुल, रामटेके PTO मुल, अनिल बोरकर PTO मुल,विवेक जुमनाके PTO नागभिड,दिपक चर्तृवेदी PTO गोंडपिपरी, यश पंदीलवार PTO गोंडपिपरी,सिमंत येरपुडेPTO नागभिड, सागर बनसावार PTO गोंडपिपरी सारीका ईश्वर गेडाम उपसरपंच,चंदाताई विनोद कामडी ग्रा.पं.सदस्या, रोशनी विकास मोहुलै, अरूणा रामदास वाढई, सुवर्णा विलास कावळे, ग्रा.पं.सदस्य मनिष प्रकाश चौधरी व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.