News 34 chandrapur
चंद्रपूर : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दिल्या जाणा-या स्पर्धा पुरस्कारांचा निकाल जाहीर करण्यात आला असून, येत्या 1 ऑगस्ट 2022 रोजी एका सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यंदापासून सुरू करण्यात आलेला ‘डिजिटल मीडिया शोध पत्रकारिता पुरस्कार ‘ प्रथम प्रकाश हांडे (न्युज-34,चंद्रपूर) आणि व्दितीय पुरस्कार विजय सिद्धावार( पब्लिक पंचनामा:मुल) यांना जाहीर झाला आहे.
Journalist award 2022 chandrapur
शिक्षण महर्षी तथा माजी आमदार स्व. श्रीहरी बळीराम जीवतोडे स्मृतीप्रित्यर्थ ग्रामीण वार्ता पुरस्कारांचे प्रथम मानकरी विकास खोब्रागड़े ( लोकमत -पळसगाव (पी,), व्दितीय- गणेश लोंढे (देशोन्नती- कोरपना), तृतीय प्रशांत डांगे (महासागर-ब्रम्हपुरी) हे ठरले आहे, तर प्रोत्साहनपर पुरस्कार मध्ये अमर बुद्धपवार (पुण्यनगरी- सिंदेवाही), राजकुमार चुनारकर (लोकमत, चिमूर), यांचा समावेश आहे. Investigative Journalism Awards
स्वर्गीय सुरजमलजी राधाकिशन चांडक स्मृति प्रित्यर्थ ‘मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार‘ साईनाथ कुचनकार (लोकमत, चंद्रपूर) यांना जाहिर झाला आहे. चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी आयोजित स्व. छगनलाल खजांची स्मृती शुभवार्ता पुरस्कारासाठी साईनाथ सोनटक्के (सकाळ, चंद्रपूर) यांच्या बातमीची निवड करण्यात आली. तर इतिहास अभ्यासक अशोकसिंह ठाकूर प्रायोजित वृत्तछायाचित्र स्पर्धा पुरस्कार कु. प्रियंका पुनवटकर (चंद्रपूर) यांच्या छायाचित्राची निवड झाली आहे. तसेच स्व. सुशीला राजेंद्र दीक्षित स्मृतिप्रित्यर्थ उत्कृष्ट वृत्तांकन (टि.व्ही) पुरस्कार अनवर शेख (टि.व्ही. जय महाराष्ट्र, चंद्रपूर) यांना जाहीर करण्यात आला आहे. यंदापासून सुरू करण्यात आलेला ‘डिजिटल मीडिया शोध पत्रकारिता पुरस्कार ‘ प्रथम प्रकाश हांडे (न्युज-34, चंद्रपूर) आणि व्दितीय पुरस्कार विजय सिद्धावार( पब्लिक पंचनामा:मुल) यांना जाहीर झाला आहे.
1 ऑगस्ट 2022 रोजी आयोजित कार्यक्रमात सर्व पुरस्कार विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच यावेळी ‘जीवनगौरव पुरस्कार ‘ ज्येष्ठ पत्रकार सुनिल देशपांडे, तर“कर्मवीर पुरस्कार ‘ बाळ हुनगूंद व प्रा.यशवंत मुल्लेमवार यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
विविध स्पर्धा पुरस्काराचे परिक्षण जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर,प्रा.योगेश दुधपचारे आणि सामाजिक कार्यकर्ते बंडु धोतरे यांनी केले. अशी माहिती स्पर्धा संयोजक रमेश कल्लेपेल्ली, योगेश चिंधालोरे, कमलेश सातपुते, देवानंद साखरकर व राजेश निचकोल यांनी प्रसिध्द पत्रकातून दिली आहे.