News 34 chandrapur
गुरू गुरनुले
मुल - मुल नगरात आज झालेल्या अतिवृष्टी पाऊसामुळे वॉर्ड नंबर १५ येथील नागरिक श्री.मारोतराव भंडारे व त्यांना लागून असलेल्या आजूबाजूच्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. Heavy rain
हे पाणी चंद्रपूर रोड लगत गव्हाणकर यांचे खाली असलेल्या जागेतून पाणी वाहत आल्याने दोन्ही बाजूच्या नाल्या तुडुंब भरल्याने प्रा. वासाडे यांचे घरासमोर तलावाचे स्वरून निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच विहिरगाव येथील संजय मेश्राम यांच्या घरात पाणी घुसल्याने घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. Rain in chandrapur
श्रमिक नगर वॉर्ड नंबर 8 येथील श्री अजय गुरनुले यांच्याही घरात पाणी जमा झाले. तसेच नागपूर रोडलगत भाग्यरेखा परिसरात श्रीकांत गिरडकर यांच्याही घरात पाणी घुसले सभोवतालच्या घरातही पाणी साचले.
काही वॉर्डातील घरांची पडझड देखील झाली आहे. याबाबत तालुका तहसीलदार व नगर परिषद प्रशासकीय अधिकारी यांनी पाणी घुसलेल्या घराची प्रत्यक्ष पाहणी करुन संबधित नागरिकांची कोणती नुकसान झाली याबाबत नागरिकांना प्रत्यक्ष भेटून विचारणा करावी व तसा अहवाल तातडीने उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांना पटविण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी केली असून मागील सत्ता पक्षाच्या पदाधिकारी आणि नगर परिषद प्रशासनाच्या ढसाळ नियोजन शून्य कारभारामुळे मूलच्या नागरिकांवर आली असल्याची टीकाही मूलच्या नागरिकांच्या वतीने केली आहे. पाण्याचा जोर अजूनही कायम असून जर का पुन्हा जोमाने पाऊस आला तर परत नागरिकांना धोका होऊ शकतो यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे असे आव्हान संतोष रावत यांनी केले आहे. Rainwater
गेली दोन दिवस मुल शहरात झालेल्या संततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे सुमारे ३०० घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांन सामान वाहून गेले व काही घरांची पडझड देखील झाली आहे. नागरिकांना घर सोडून अन्यत्र निवारा शोधावा लागला आहे. या घटनेची तातडीने दखल घेत नागरिकांच्या झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करावे आणि नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही त्वरेने करावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांसह उपविभागीय अधिकारी मुल, तहसीलदार मुल आदींना आ. मुनगंटीवार यांनी दिले आहे.



