News 34 chandrapur
चंद्रपूर - महाविकास आघाडी सरकारने बाठिंया आयोग स्थापन केल्यामुळेच हा सकारात्मक निर्णय लागला. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडीने सर्वतोपरि प्रयत्न केले. Banthia Commission
याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जाहीर आभार मानतो, अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
Obc reservation
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. Political reservation सर्वोच्च न्यायालयाने बाठिंया आयोगाचा अहवाल मान्य केला असून दोन आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिले. Supreme court त्यावर बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले, बांठिया आयोगाच्या शिफारसीनुसार, ओबीसी राजकीय आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यास ओबीसी प्रवर्गातील लोकप्रतिनिधींना महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायतीच्या प्रमुख पदावर काम करण्याची संधी मिळेल.