News 34 chandrapur
चंद्रपूर - दिनांक 03/07/2022 शासकीय विश्रामगृह च्या सभागृहा मधे चंद्रपूर शहर राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या वतीने खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी व बारावी मध्ये उच्च गुण संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. Supriya sule birthdayयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, डी.के आरीकर, विद्यार्थी अध्यक्ष कोमील मडावी महिला विधानसभा अध्यक्ष अंजलीताई परकरवार, युवती कार्याध्यक्ष अश्विनी तलापल्लिवर, युवती उपाध्यक्ष स्वाती दुर्गमवार, हिमांगी बिस्वास, विद्यार्थी उपाध्यक्ष विपिन लभाने, सचिव शालिक भोयर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, व फुलांचे झाड देऊन सत्कार करण्यात आले, सोबतच आलेल्या पालकांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

