News 34 chandrapur
गुरू गुरनुले
Mul- माजी खासदार स्व.वि.तू.नागापुरे व लोकमत संपादक स्व.जवाहर दर्डा यांच्या जयंती निमित्य इंडीयन मेडिकल असोसिएशन च्या माध्यमाने शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित कर्मवीर महाविद्यालय मूलच्या राष्ट्रीय सेवा योजना पथक आणि NCC (राष्ट्रीय छात्र सेना) यांच्या संयुक्त विद्यमाने IMA हॉल गंजवार्ड चंद्रपूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. Blood donation camp
रक्तदान शिबिराला शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब वासाडे,प्राचार्या डॉ.अनिता वाळके, प्रा. देवानंद मासिरकर,प्रा.दिनेश बनकर, रासेयो प्रमुख प्रा.प्रवीण उपरे,प्रा.गजानन घुमडे, प्रा.अनिल शेलेकर,प्रा.सिकंदर लेनगुरे, प्रा.राहुल बोधे, प्रा. निखिल दहिवले रासेयो व एनसीसी चे विद्यार्थी उपस्थित होते.
गरजवंतांना वेळीच रक्ताचा पुरवठा व्हावा या उद्देशाने कर्मवीर महाविद्यालय मूल नेहमीच रक्तदान हेच जीवनदान आहे असे समजून तसेच आरोग्य शिबीर भरवीत असते.स्व.वि तू नागापुरे व जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
या रक्तदान शिबीरात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्फुर्त सहभाग घेतला.

