News 34 chandrapur
राजुरा - तालुक्यातील वरूर रोड येथे मागच्या वर्षी म्हणजे 8 फेब्रुवारी 2021 मध्ये रेती व गिट्टी सप्लाय करण्याचे काम करणाऱ्या व्यावसायिक यांचा रेती ने भरलेला ट्रक तलाठी विनोद गेडाम यांनी पकडला होता.
Talathi bribery
Talathi bribery
त्यावेळी कार्यवाही न करता ट्रक सोडतो त्यासाठी 70 हजार रुपये दे अशी मागणी तलाठी गेडाम यांनी केली. Acb trap
35 हजार रुपयांची रक्कम रेती व्यावसायिकाने दिली व उर्वरित रक्कम ही 2 ते 3 दिवसांनी देतो असे तलाठी गेडाम यांना सांगण्यात आले.
पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने रेती व्यावसायिकाने याबाबत लाचलुचपत चंद्रपूर विभागाकडे तक्रार केली. Bribe
सदर प्रकरणाची पडताळणी करण्यात आली असता त्यामध्ये तब्बल 1 वर्षांनी तलाठी विनोद गेडाम यांनी 25 हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविली असता 19 जुलै ला आरोपी तलाठी गेडाम यांना रंगेहात अटक करण्यात आली. Chandrapur acb
विशेष म्हणजे तलाठी गेडाम हे राज्य शासनाच्या आदर्श तलाठी चे पुरस्कार प्राप्त आहे.
सध्या पुढील तपास सुरू आहे, सदरची यशस्वी कामगिरी राकेश ओला, अधीक्षक, पोलीस उपायुक्त, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे, रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे, संदेश वाघमारे, रवी धेंगळे, राकेश जांभुलकर, मेघा मोहूर्ले, पुष्पा काचोडे व सतीश सिडाम यांनी केली.