News 34 chandrapur
चंद्रपूर/माजरी - मुसळधार पाऊस थांबला मात्र जिल्ह्यातील धरण भरल्यानंतर आता त्यामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आता त्या विसर्ग झालेल्या पाण्याने चंद्रपूर जिल्ह्यात हाहाकार माजविला आहे.
इरई, गोसेखुर्द व निम्न वर्धा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने जिल्ह्यातील विविध भागात पूर आला. Chandrapur flood 2022
माजरी येथे वर्धा नदीच्या पाण्याने पुराचे रूप घेत पटाला, कुचना, नागलोन, राळेगाव, मनगाव, बिसालोन, चालबर्डी, कोंढा, देऊलवाडा व माजरी वस्तीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा शिरकाव झाला.
माजरी कॉलरी मधील 1 नंबर दफाई, एकता नगर, महाजन नगर, चैतन्य कॉलनी, शांती कॉलनी, आंबेडकर वार्ड, तेलगू दफाई, न्यु हाऊसिंग कॉलनी, महेबिया दफाई या वॉर्डातील अनेक घर पाण्याखाली गेले. Maharashtra flood
सिरणा नदी पूल, वर्धा नदी पूल व कोंढा नाल्यावर स्थित पुलावरून तब्बल 8 फूटाच्या वर पाणी वाहत आहे.
वेकोली माजरी क्षेत्र महाप्रबंधक विके गुप्ता, पोलीस निरीक्षक विनीत घागे, पटवारी शंभरकर व अन्य सर्व पूर परिस्थिती वर नजर ठेवून बचाव कार्य पार पाडत आहे. Flood situation
तर दुसरीकडे चंद्रपूर महानगरपालिका तर्फे नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा दिला असून ऊर्ध्व वर्धा, गोसीखुर्द, ईरई येथील धरणांचे मोठया प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे त्यामूळे
वर्धा नदीला 2 मिटर पर्यंत पाण्याची पातळी आज केव्हाही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे चन्द्रपुर शहरातील नदी लगत असलेल्या गावांत पाणी जाण्याची दाट शक्यता आहे. तरी सर्वांना नम्र विनन्ती करण्यात येते की आपण आपल्या सर्व नदीकाठचे लोकांना सतर्क राहण्याची सुचना देण्याचे करावे.
तसेच आज नदीच्या काठावर कोणीही जाऊ नये असे आवाहन मनपाने केले आहे. Chandrapur municipal corporation alert