News 34 chandrapur
चंद्रपूर - देशाचे राजकारण नेहमी बदलत असते मात्र त्या राजकारणात युवक वर्गाचा काय सहभाग असायला हवा, कशाप्रकारे राजकारणात काम होत असते, लहान पदापासून ते मोठ्या पदापर्यंत कशी मजल मारता येते याच ज्ञान आजच्या तरुणाईला नाही.
Indian politics
Indian politics
मात्र निवडणूक कशाप्रकारे घेतल्या जाते, ती पद्धत कशी याबाबत शहरातील नामवंत महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित पॅरामाऊंट कॉन्व्हेंट येथील विद्यार्थ्यांना निवडणुकीद्वारे समजविण्यात आले. Election in school
यासाठी कॉन्व्हेंट मध्ये स्कुल हेड बॉय, हेड गर्ल, स्पोर्ट्स बॉय, स्पोर्ट्स गर्ल अशी निवडणूक घेण्यात आले, इतकेच नव्हे या निवडणुकीत निवडणूक अधिकारी व बॅलेट पेपर सारख्या वस्तू तयार करीत उमेदवारांना निवडणूक चिन्ह वितरित करण्यात आली.
सदर निवडणूक कार्यक्रमात 5 वी ते 10 व्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत मतदान केले. Paramount convent
विशेष म्हणजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पी.एस. आंबटकर, सहित मुख्याध्यापक फैय्याज अहमद व शिक्षक वृंदानीही मतदान प्रक्रियेत सहभाग दर्शविला.
खाजगी शाळेत घेण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनाला भुरळ पाडणारा होता, विद्यार्थ्यांनी हा आगळा वेगळा उपक्रम घेतल्याबद्दल अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक वृंदाचे आभार मानले.