News 34 chandrapur
चंद्रपूर - चंद्रपूर शहरात मागील काही महिन्यांपासून घरफोडीच्या घटनेत वाढ झाली होती, अनेक घरफोडीचे गुन्हे घडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती, इतकेच नव्हे तर पुरात बुडालेल्या घरात सुद्धा चोरांनी हात साफ केला. Crime newsहे सर्व गुन्हे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले होते, त्याकरिता पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शोध पथकातील सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वात घरफोडीचे गुन्हे उघडकीस करण्यास यश प्राप्त झाले असून एकूण 6 घरफोडी करणाऱ्या विविध आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
8 मे 2022 रोजी डॉ. निखिल बिश्वास यांनी यांनी तक्रार दिली की ते परिवारासाहित वास्तूच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले असता अज्ञातांनी घराच्या मागील बाजूने प्रवेश करीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 1 लाख 91 हजारांचा मुद्देमालावार हात साफ केला. House burglary
दुसरा गुन्हा 23 जून 2022 रोजी सुभाष दासरपू हे परिवारासाहित बाहेर गावी गेले असता अज्ञातांनी घरात प्रवेश करीत लॅपटॉप व सोन्याचे दागिने असा एकूण 1 लाख 16 हजार रुपयांच्या मालावर हात साफ केला. Chandrapur police
गुन्हे शोध पथक प्रमुख एकरे यांनी मोठ्या शिताफीने घरफोडीच्या प्रकरणात तपास करीत छडा लावला, पहिल्या गुन्ह्यातील आरोपी मनी कालीपद बिश्वास, सुमन दिलीप डकूआ, पिंकू नरेंद्र मिस्त्री यांना अटक केली.
यांच्या कडून सोन्याचे दागिने किंमत 1 लाख 61 हजाराचा माल जप्त केला.
दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुनिर खां पठाण, शुभम सुधाकर रामटेके यांना अटक करीत त्याचेंजवळून 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुरात अडकलेल्याया नागरिकांना मदत करायचे सोडून त्यांचे घर फोडणारे आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ज्यामध्ये आरोपी करन ओमप्रकाश टंडन जवळून 15 हजार रुपयांचा मुद्देमाल, दुसऱ्या गुन्ह्यात याच आरोपी जवळून मूर्तीचे मंगळसूत्र किंमत 15 हजार रुपये जप्त करण्यात आले.
विधी संघर्ष बालकाकडून 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, उमाकांत सुनील उदासीन 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई यशस्वीपणे जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश मुळे, सपोनि हर्षल एकरे, पोउपनी विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, मर्सकोल्हे, विनोद यादव, किशोर वैरागडे, आनंद खरात यांनी पार पाडली.
