News 34 chandrapur
मूल (गुरू गुरनुले)
मागील काही दिवसांपासुन तालुक्यात पडत असलेल्या संततधार व मुसळधार पावसामूळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामूळे शासनाने पावसाचे प्रमाण आणि वास्तविक परिस्थिती लक्षात घेवुन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला मदतीचा हात द्यावा.
अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे. Heavy rains
अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे. Heavy rains
मुख्यमंञी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात संतोषसिंह रावत यांनी यावर्षीचा पावसाळा मूल तालुक्यातील जनतेला हैरान करीत आहे. मागील काही दिवसांपासुन तालुक्यात संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर शेती सतत पाण्याखाली आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविता यावा म्हणुन शेतात केलेली धान पेरणी खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्यांचीही रोवणी मुसळधार पावसामूळे खराब झाली असुन अनेकांच्या घरांची पडझड झाल्याने त्यांचेवर उघड्यावर राहण्याचे संकट कोसळले आहे. दोन दिवसांपुर्वी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी नियोजनशुन्य रस्ते व नाली बांधकामामूळे मूल शहराच्या अनेक वार्डातील घरात पाणी घुसून सामानाची नासधूस झाली. मूल शहरात बस स्थानकामागे आणि दुर्गा मंदीर बाजुला असे दोन मोठे तलाव आहेत. या दोन्ही तलावाचे खोलीकरणाचे काम करण्यात येवुन सिंचाई विभागाने पाळीची उंची वाढवली. परंतु दोन्ही तलावाच्या सांडव्याच्या (वेस्टवेअर) कामाकडे दुर्लक्ष केले. तलावाचे खोलीकरण करतांना क्षमतेपेक्षा जास्त पाणी तलावात जमा झाल्यास ते वाहुन जाण्यासाठी असलेल्या वेस्टवेअरचे योग्य पध्दतीने बांधकाम करणे गरजेचे होते. परंतु दोन्ही तलावाच्या वेस्टवेअर बांधकामाकडे सिंचाई विभागाने दुर्लक्ष केल्याने दोन्ही तलावालगत असलेल्या घरांना बँकवाँटरचा ञास सहन करावा लागत आहे. दोन्ही तलावाच्या बँकवाँटर मूळे परीसरातील नागरीकांचे प्रचंड नुकसान झाले असुन मानवी कृतीमूळे घडलेल्या चुकांची झळ जनतेला सोसावी लागत आहे. संततधार पावसामूळे झालेले शेतीचे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहतांना गोधनाचीही अपरीमित हानी होण्याचे दुःख पचविण्याचे संकट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर कोसळले आहे. घराची भिंत पडुन शेळ्या, नदी नाल्यांच्या प्रवाहात गायींचे वाहुन जाणे आणि विजेचा धक्याने बैलाचा, शेतकऱ्याचा मृत्यु या घटनेमूळे तालुक्यातील शेतकरी चांगलेच धास्तावले आहे. संंततधार व मुसळधार पावसामूळे शेतकरी व जनता बेजार झाली असतांना दुसरीकडे कोरोनाचेही संकट घोंगावात आहे, दिवसागणीक कोरोनाच्या रूग्ण संख्येत वाढ होत असुन निच-या अभावी साचलेल्या पावसाच्या पाण्यामूळे अन्य प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. अश्या या अस्मानी संकटाच्या काळात शेतकरी आणि जनतेला सहकार्याचा हात देण्यासाठी शासनाने पुढाकार घेवुन चंद्रपूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतीसाठी घेतलेल्या पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्कालीन शासनकर्त्यांनी जाहीर केलेल्या प्रौत्साहनपर अनुदानाची राशी देण्यासंबंधी विचार व्हावा, अशी विनंती संतोषसिंह रावत यांनी निवेदनाव्दारे केली आहे. wet drought
संततधार व मुसळधार पावसामूळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा संदर्भात चर्चा करून योग्य निर्णय घेण्यासाठी बँकेचे सर्व संचालक प्रयत्नशील आहेत.
संतोषसिंह रावत
अध्यक्ष जि.म.स.बँक चंद्रपूर

