News 34 chandrapur
वरोरा - सत्तेत मोठं पद मिळविण्यासाठी शिवसेनेचे 40 आमदार फोडून राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे विराजमान झाले. आठवडा भर सुरू झालेली बंडखोरी भाजपशी युती करताच संपली व राज्याच्या राजकारणात शिंदे यांनी मोठा भूकंप घडवून आणला, इतकेच नव्हे तर आता शिवसेनेचे 12 खासदार त्यांनी आपल्या गोटात नेले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाप्रमुख यांची बैठक बोलावीत पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यायला लावली.
आता स्टॅम्प पेपर वर आम्ही शिवसेना पक्ष व उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणार असे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले. Shivsena news
चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या कार्यालयात चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत कदम आले होते.
विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बैठकही घेतली, शेवटी कार्यालयाबाहेर उभे राहत जिल्हाप्रमुख जीवतोडे यांनी संपर्कप्रमुख यांच्यासोबत फोटो काढला मात्र त्यांच्या मागील बाजू असलेल्या बॅनर वर कदम यांच लक्ष गेलं नाही.
त्या बॅनर वर शिवसेना पक्षाशी बंडखोरी करणारे एकनाथ शिंदे यांचा फोटो आजही तिथेच आहे.
बॅनर जुना असला तरी तो अजून तिथे काय करीत आहे? शिंदे यांच्या गटात कुणीही सहभागी होऊ नये यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे मात्र चंद्रपुरात हे चित्र वेगळंच, पुढे एकनिष्ठतेची शपथ आणि मागे बंडखोरी करणारे शिंदे हा चर्चेचा विषय बनला आहे.
