News 34 chandrapur
चंद्रपूर/नांदगाव - चंद्रपूर जिल्हा हा आज अपघाताने हादरला, पहिल्या घटनेत चंद्रपुरातील पडोली मार्गावर गर्भवती महिलेसह 3 वर्षीय चिमुकल्याचा ट्रक च्या धडकेत मृत्यू झाला. Chandrapur today news
दवाखान्यात तपासणी करीत पती निखिल टावरी, 5 वर्षीय मुलगी कनक, 3 वर्षीय बालक लक्ष्य सहित 27 वर्षीय नम्रता टावरी आपल्या दुचाकीवर जात होते, त्यावेळी घुग्घुस वरून येणाऱ्या ट्रकने टावरी यांच्या दुचाकीला धडक दिली, या धडकेत 3 वर्षीय लक्ष्य सहित गर्भवती नम्रता टावरी यांचा जागीच मृत्यू तर पती निखिल व मुलगी कनक गंभीर जखमी झाले.
पडोली मार्गावर सतत उभे राहणारे जड वाहन पडोली मध्ये झालेल्या अपघाताला कारणीभूत ठरले. Pregnant woman die
तर दुसऱ्या घटनेत विसापूर मार्गावरून बल्लारपूर येथे जाणाऱ्या दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. Accident
दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हा अपघात घडला, मृतक दुचाकीस्वार 27 वर्षीय हेमंत राजन्ना पत्तीवार हा बल्लारपुरातील भगतसिंग वार्डातील निवासी होता.
हेमंत हा बल्लारपूर वेकोली मध्ये कर्मचारी होता, मात्र तो आज नांदगाव या गावात काही कामानिमित्त गेला, दुचाकी MH34BX2288 क्रमांक ने बल्लारपूर कडे परत येत असताना विसापूर जवळील हनुमान मंदिर समोर दुचाकी वाहनावरील नियंत्रण सुटले असता दुचाकी पुलावर जाऊन आपटली. Head injury
विशेष म्हणजे सदर दुचाकी वाहन हे नांदगाव पोडे येथे राहणारे दत्ता वाघमारे यांच्या नावावर आहे.

