चंद्रपूर/पडोली - शहरात दुपारच्या सुमारास पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुटाळा गावाजवळ भीषण अपघाताने संपूर्ण पडोली परिसर हादरून गेला. Terrible accident
भीषण अपघातात गर्भवती महिला व 3 वर्षीय चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.
27 वर्षीय नम्रता निखिल टावरी ही आपल्या पतीसोबत दवाखान्यात तपासणी करण्यासाठी निघाले त्यांच्या सोबत 5 वर्षीय मुलगी कनक टावरी व 3 वर्षीय लक्ष हे चारजण दुचाकी वाहन क्रमांक MH34 BQ2057 ने पडोली कडे जात होते, त्यावेळी घुग्घुस वरून पडोली कडे येणाऱ्या ट्रक क्रमांक MH40BL5827 ने टावरी यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की यात 3 वर्षीय लक्ष्य व गर्भवती नम्रता जागीच ठार झाली. Padoli accident
पती निखिल टावरी व 5 वर्षीय कनक या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले. सदर अपघात 12 वाजताच्या दरम्यान घडली.
मृतक व जखमी हे लहुजी नगर निवासी आहे.
सदर अपघाताने खुटाळा गावातील नागरिक संतप्त झाले होते. ट्रक वाहन चालकाला पडोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Heavy traffic
विशेष म्हणजे 1 महिन्याआधी खुटाळा गावातील नागरिकांनी जड वाहनाविरुद्ध ग्रामपंचायत ला निवेदन दिले होते, भविष्यात जड वाहनांमुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र 1 महिन्यांपूर्वी दिलेल्या निवेदनावर काही कारवाई झाली नाही, पण मोठा अपघात झाला, जर कारवाई झाली असती तर आज गर्भवती महिला व 3 वर्षीय बालकाला आपला जीव गमवावा लागला नसता.
घुग्घुस ते पडोली या मार्गावर जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते, पण अनेक दिवसांपासून सदर मार्गावर जड वाहने रस्त्यावर उभे केली जात आहे.
खुटाळा येथील नागरिकांनी एकत्र येत सदर जड वाहतुकीवर कारवाई करावी यासाठी निवेदन दिले जर मागणी पूर्ण झाली नाही तर यावर आंदोलन उभारणार असा इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला. सदर अपघाताची माहिती जाणून घेण्यासाठी पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना सम्पर्क केला असता त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. जर वेळीच पोलीस व वाहतूक पोलिसांनी कारवाई केली असती तर आज हा अपघात घडला नसता.
यावर पोलीस व वाहतूक प्रशासनाने कारवाई करायला हवी होती? नागरिकांना जड वाहने रस्त्यावर उभी दिसतात मग पोलीस प्रशासनाला का नाही?


