News 34 chandrapur
चंद्रपूर : निवासी इमारतीमधील देशी दारू दुकानाच्या अनधिकृत गाळ्यांचे विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याच्या मागणीकरिता पाठपुरावा करणारे वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी १० जून रोजी आपल्या कार्यालयात येऊन धमकी दिली, अशी खोटी तक्रार मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली. या तक्रारीवरून देशमुख यांच्याविरुद्ध भां.द.वि.च्या कलम १८६ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोंगाळे यांनी या प्रकरणात २ जुलै रोजी देशमुख यांचे बयान नोंदवून घेतले. Police complaint
नागपूर रोडवरील महालक्ष्मी टाॅवर या इमारतीला केवळ निवासी बांधकाम व स्टोरअची परवानगी आहे. तर दाताळा रोडवरील जुमडे यांच्या इमारतीला केवळ निवासी परवानगी आहे. मात्र या दोन्ही इमारतीमध्ये अनधिकृत गाळ्यांचे बांधकाम करून देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी इमारतींचा वाणिज्य वापर सुरू केला आहे. ही बाब २८ एप्रिल २०२२ रोजी झालेल्या स्थायी समितीमध्ये मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर मनपा प्रशासनाने दोन्ही इमारतींच्या मालकांना परवानगी व्यतिरिक्त केलेले अनधिकृत बांधकाम काढण्याचे व बांधकाम पाडल्याचा अहवाल मनपाला सादर करा, मुदतीत अनधिकृत बांधकाम न काढल्यास मनपाकडून काढून खर्च वसूल करीत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा नोटिसाद्वारे दिला होता. मात्र ४० दिवसाचा कालावधी लोटल्यानंतरही याबाबत कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विचारना करण्यासाठी आपण मनपा आयुक्त राजेश मोहिते यांची १० जून रोजी भेट घेतली. threat war
मात्र नियमानुसार कारवाई करण्यास स्पष्ट नकार देत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच बाउन्सर आणून कार्यालयातून उचलून काढण्याचा इशारा दिला. एवढेच नव्हे तर बाऊन्सर बोलवण्यासाठी त्यांनी माझ्या समक्ष कोणालातरी फोनसुद्धा केला. यावेळी तात्काळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना फोन करून पोलीस पाठवण्याची विनंती केली. परंतु आंभोरे यांनी पोलीस पाठविण्यास नकार दिला. दरम्यान मी स्वतः शांततेने आयुक्त कार्यालयातून निघून गेलो. तरीसुद्धा अनधिकृत दारू दुकानांना संरक्षण देण्यासाठी व आपल्या बेकायदेशीर कृत्यावर पांघरून घालण्यासाठी मनपा आयुक्तांनी खोटी तक्रार केल्याचा आरोप देशमुख यांनी केलेला आहे.
अनाधिकृत दुकानाविरोधात खुलासे करणार
शहरातील अनाधिकृत दारु दुकानाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. याबाबत आयुक्तांना तक्रार करुन कारवाई झाली नाही. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन अनधिकृत दारू दुकानाच्या विरोधात अनेक खुलासे करणार असल्याची माहिती पप्पू देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रकातून दिली आहे.

