News 34 chandrapur
चंद्रपूर, दि. 3 जुलै : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, आरोग्य विभाग टाटा ट्रस्ट, सिटी पोलीस स्टेशन तसेच चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देह विक्री (Prostitution) करणाऱ्या महिलांना प्रशिक्षित करण्याबाबत (मानवी तस्करी व व्यापारी आणि लैंगिक शोषणाचे बळी) या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
human trafficking
सदर कार्यशाळेला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी, संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोडे, धनंजय तावाडे, tata trust टाटा ट्रस्टचे डॉ.आशिष बारब्दे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.
Victims of sexual abuse
जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा कविता बी. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात दि. 2 जुलै रोजी रेड लाईट एरिया, (red light area) गौतम नगर, चंद्रपूर येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (मानवी तस्करी व व्यापारी आणि लैंगिक शोषणाचे बळी (victims of sexual harassment should ) योजना 2015 बाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुमित जोशी यांनी मार्गदर्शन केले. संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष राज काचोडे यांनी संबोधन ट्रस्ट या संस्थेमार्फत देह विक्री करणाऱ्या महिलांसाठी केली जाणारी मदत स्पष्ट केली. तर धनंजय तावडे यांनी मानवी तस्करी प्रतिबंध व उपाय योजनेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार एडवोकेट एम.बी. असरेट यांनी केले.

