चंद्रपूर - 80 व 90 व्या दशकातील पत्रकारिता व आजची पत्रकारिता यामध्ये बराच बदल झालेला आहे.
पूर्वी एका बातमीने खळबळ उडायची तर आता प्रत्येक बातमी खळबळजनक असते. The crime
आधी सायकलवर किंवा पायदळ जात बातमी घेण्याचे काम व्हायचे आता सरळ चारचाकी वाहनाने बातमी घेतल्या जात आहे.
आधी पत्रकार म्हटलं की लोकांच्या नजरेत मानाचं स्थान असल्याचं आता पत्रकारांना पळविल्या जात आहे.
आधी प्रामाणिक पत्रकारिता असायची तर आता बेईमानी पत्रकारिता सुरु झाली आहे.
जसा काळ बदलला तसे पत्रकारितेचे स्वरूप ही बदलले आहे.
पत्रकारितेत आधी प्रामाणिक व सोज्वळ मनाचे पत्रकार असायचे तर आता गुन्हेगारी व गंभीर गुन्हे दाखल असलेले पत्रकार बनायला लागले आहे. Chandrapur police
आधी वर्तमानपत्र व प्रसार माध्यमांना पत्रकार म्हणून प्रतिनिधी मिळत नव्हते तर आता प्रत्येक गल्लीबोळात पत्रकार जन्माला येत आहे.
जो तो डिजिटल न्यूज च्या नावाने पैसे उकळण्याचे काम करीत आहे.
गुन्हेगारी व राजकीय क्षेत्रातून पत्रकारितेचा अतिरेक वाढत आहे, मात्र यावर नियंत्रण कुणाचेच नाही, शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या विरोधात बातमी प्रकाशित करीत त्यांना ब्लॅकमेल करण्याचे अनेक प्रकरणे घडली आहे.
मात्र यावर कुणी आवाज उचलला नाही, चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे चालकांकडून पैसे उकळण्याचा गोरख धंदा सर्रासपणे सुरू आहे. Blackmail
मात्र चंद्रपूर शहरातील एकमेव पोलीस निरीक्षकांनी अश्या गुन्हेगारी पत्रकारितेला चांगलाच चाप दिला आहे.
पोम्भूर्णा येथील पत्रकारितेतून राजकीय प्रवास केलेल्या व्यक्तीने विधवा महिलेकडून खंडणी उकळण्याचा प्रकार केला, महिलेने तक्रार केल्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत, त्या राजकीय गुन्हेगाराला अटक केली.
डिजिटल मीडियाने पत्रकारितेचे स्वरूपचं बदलले, आजची बातमी आजच्या आज प्रसारित होऊ लागली याचा सर्वात जास्त फटका वृत्तपत्राला बसला, वाचकवर्ग कमी झाला असला तरी आजही वृत्तपत्रांवर नागरिकांना विश्वास आहे.
डिजिटल मीडिया ची नोंदणी केल्यावर न लिहता येणारा सरळ मुख्य संपादक बनतो, मात्र इकडून तिकडून माहिती गोळा करीत कुणाच्याही विरोधात बातमी टाकत पैसे उकळण्याचे धंदे मागील काही दिवसांपासून वाढले आहे.
आता तर चक्क आम्ही पोलीस विभागातून आलो आहे असे सांगत अवैध धंदे चालकांच्या झडती घेण्याचे काम ही भुरटे पत्रकार करू लागले. Digital news media
अवैध वाळू तस्कर, दारू माफिया, तंबाखू माफिया यांचेकडे जात डिजिटल मीडियाच्या नावाखाली गुन्हेगारी पत्रकारिता सुरू आहे.
या पत्रकारांवर गंभीर गुन्हे दाखल आहे, प्राणघातक हल्ला, खंडणी, बदनामी, काही जणांवर तर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल असून ते आजही पत्रकारितेमध्ये सक्रिय आहे.
दारूबंदीच्या वेळेस तर काही पत्रकार चारचाकी वाहनाने दारू तस्करी करीत होते.
मात्र या सर्व घडामोडीवर पोलीस प्रशासन सावधान झाला असून सदर गुन्हेगारी प्रवृत्तीची पत्रकारितेविरोधात कठोर पाऊले उचलत आहे. News portal
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी सध्या खाकी चा दम दाखवायला सुरुवात केली आहे, काही दिवसांपूर्वी किराणा व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाऱ्या Youtube चॅनेल च्या पत्रकाराला ताब्यात घेण्यात आले, सदर पत्रकाराने जिल्ह्यात उन्माद माजविला होता, त्यानंतर पोलीस मित्र, खबऱ्या व पोर्टल च्या पत्रकाराने शहर पोलिसाला खंडणी मागितली.
पोलिसांसोबत राहून त्यांची माहिती बाहेर काढत त्याबद्द्ल बातमी लिहण्यास सांगून 30 हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
मात्र दबंग पोलीस अधिकारी आंभोरे यांनी सदर गुन्हेगारी वृत्तीला चांगलाच चोप दिला.
पत्रकारांच काम समस्यांना वाचा फोडण्याचे असते मात्र असे पत्रकार हे स्वतःच्या पैश्यांची समस्यांचं निराकरण करीत असतात.
शहरातील उन्माद माजविणाऱ्या खंडणीखोर व गुन्हेगारी वृत्तीच्या पत्रकारविरोधात आंभोरे यांचं हे अभिनंदनीय पाऊल आहे पण सदर वृत्तीचे पत्रकार अवैध धंदे व्यावसायिकांकडून पैसे उकळत आहे त्यांचे अवैध धंदे पोलिसांनी बंद केल्यास असे प्रकार घडणार नाही.
सध्या पोलिसांच्या रडारवर अनेकांची नावे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

