News 34 chandrapur
चंद्रपूर/मुंबई - धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह असलं तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्हं लोक लक्षात घेतात. माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही. धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. Uddhav thackeray
महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर राज्यात सत्तेचे राजकारण बघायला मिळाले, शिवसेना व अपक्ष आमदार असे एकूण 50 आमदार फोडत एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत हातमिळवणी करीत राज्यात सत्ता स्थापन केली.
शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा नव्याने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. Shivsena
आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांवर खोचक टीका करीत त्यांचे आभार ही मानले. Rebal mla
ठाकरे कुटुंबावर केलेल्या टिकेवर बंडखोर आमदारांनी प्रत्युत्तर दिले, त्यावर आम्हाला अभिमान आहे, मात्र ज्यांनी अश्लाघ्य भाषेत ठाकरे कुटुंबावर टीका केली आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बंडखोर आमदार बसले आहे. Shinde bjp alince
शिंदे गटाने शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हावर केलेला दावा आपण उधळून लावणार असे ही वक्तव्य ठाकरे यांनी यावेळी केले, धनुष्यबाण आजही आपलाच आहे, शिवसेनेचा धनुष्यबाण कुणी कधीच हिरावू शकत नाही. जेव्हा पक्षाचा एक आमदार असतो आणि तो जर पक्ष सोडून गेला तर पक्ष संपतो का? त्यामुळे १ आमदार असो, ५ असो किंवा मग ५० आमदार असतो. आमदार सोडून गेल्यानं पक्ष संपत नाही.
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. संपूर्ण देशाचं ११ जुलैच्या सुनावणीवर लक्ष लागून राहिलेलं आहे. माझ्यामते ११ जुलैची सुनावणी शिवसेनेचं नव्हे, तर लोकशाहीचं भविष्य ठरवणारी असणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. Shiv Sena election symbol
माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. संपूर्ण देशाचं ११ जुलैच्या सुनावणीवर लक्ष लागून राहिलेलं आहे. माझ्यामते ११ जुलैची सुनावणी शिवसेनेचं नव्हे, तर लोकशाहीचं भविष्य ठरवणारी असणार आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. Shiv Sena election symbol