News 34 chandrapur
चंद्रपूर: चंद्रपूर शहरातिल हवा प्रदुषणावर नियत्रंण आणण्यास चंदीगडच्या धर्तीवर शहरात ‘एअर प्युरीफायर टॉवर’ खनिज विकास निधीमधुन उभारण्याची मागणी इको-प्रो कडुन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांचेकडे एका निवेदनातुन केली आहे.
prevention of air pollution
शहरातील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदुषण नियंत्रण विषयक व्यापक उपाययोजना, सर्वच स्तरात जनजागृती, आरोग्याचे सर्व्हेक्षण व प्रदुषण नियंत्रण अत्यंत आवश्यक आहे. यासाठी व्यापक जनजागृती करीता यंदा इको-प्रो तर्फे यंदा ‘माझा हक्क, शुध्द हवा!’ हे अभियान राबवीण्यात येत आहे. प्रदुषणाची तिव्रतेचा विचार करता यावर आता नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत 'चंदीगड' शहरातील यशस्वी प्रयोग बघता, चंद्रपूर शहरातही वाढत्या हवा प्रदुषणावर उपाय शोधणे अत्यावश्यक झाले आहे. या अभियान अंतर्गत काल इको-प्रो तर्फे जिल्हधिकारी अजय गुल्हाणे यांना निवदेन देत इको-प्रो चे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके यांनी ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारण्याची मागणी केली आहे. Air pollution
एअर प्युरीफायर टॉवर
भारतीय तंत्रज्ञानाने विकसीत केलेले प्रदुषीत हवा शुध्द करणारे संयंत्र ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उत्तम पर्याय असुन यामुळे बऱ्याच अंशी प्रदुषणात घट होते. मागील वर्षी 'चंदीगड' शहरात उभारण्यात आलेले सदर टॉवर चे उत्तम रिजल्ट आहे. महत्वाचे म्हणजे हे देशातील सर्वात उंच 24 मीटर टॉवर सुमारे एक किमी च्या त्रिजेमध्ये असलेली हवा शुध्द करण्यासाठी सक्षम आहे. या 24 मीटर उंच एअर प्युरीफायर टॉवरची स्थापना 'चंदीगड' मधील टॉप लिस्टेड प्रोजेक्टस् पैकी एक आहे. या टॉवरमुळे 24 तास परिसरातील हवा प्रदुषण दर्शविणारे संयत्र सुध्दा त्यात असल्याने परिसरातील हवेचा दर्जा सुध्दा कळण्यास मदत होणार आहे. या टॉवर मुळे ओढुन घेतलेले प्रदुषीत हवा आणी शुध्द करून वातावरणात सोडण्यात आलेली हवेचा दर्जा सुध्दा कळण्यास मदत होते. सोबतच या टॉवरमुळे परिसरातील तापमानात सुध्दा घट होत असल्याचे रिजल्ट चंदीगड शहरात उभारण्यात आलेल्या एअर प्युरीफायर टॉवर मुळे समोर आलेले आहे.
शहरात प्रदुषण नियंत्रणास प्राधान्य हवे!
प्रदुषण नियत्रंणात आणणारी अशी महत्वाची प्रकल्प राज्यातील व देशातील सर्वाधिक प्रदुषीत शहराच्या क्रमवारीत वरच्या स्थानावर असलेल्या चंद्रपूर शहरात सुध्दा राबविणे आवश्यक आहे. चंद्रपूर शहराच्या महत्वाच्या प्रोजेक्ट मध्ये नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रदुषणमुक्तीचे प्रकल्प प्राधान्याने वरच्या क्रमांकावर ठेवणे आवश्यक असल्याचे बंडु धोतरे यांनी निवेदनात म्हटले आहे. यांसदर्भात एअर प्युरीफायर टॉवर बाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व महानगरपालीका आयुक्त राजेश मोहीते यांना या चंदीगड मध्ये उभारण्यात आलेल्या एअर प्युरीफायर टॉवर, याचे कार्यप्रणाली व रिजल्ट बाबत सादरीकरण करण्यात आलेले होते. Atmosphere of Earth
शहरात उभारलेले ‘कुत्रीम फुफुस’ सहा दिवसातच काळवंडले होते
आज देशभरातील अनेक शहरातील हवेचे प्रदुषण लक्षात घेता, दिवसेंदिवस मोकळया हवेत श्वास घेणे कठीण झाले आहे. आज चंद्रपूर शहरातील तसेच जिल्हयातील हवा प्रदुषण जिवघेणे झाले आहे. राज्य व देशातील सर्वाधिक प्रदुषीत शहराच्या यादीत चंद्रपूर चे नाव आहे. इको-प्रो संस्थेने मागील वर्षी मुंबईच्या वातावरण फाउडेंशनच्या सहकार्याने शहरात उभारण्यात आलेले कुत्रीम फुफुस अवघ्या सहा दिवसांत काळवंडल्याने शहरातील हवा प्रदुषण अधोरेखीत झाले आहे. चंद्रपूर शहरातील प्रदुषणाची तिव्रता कमी व्हावी, प्रदुषण नियंत्रणात राहावे म्हणुन 2006 पासुन वेगवेगळे एक्शन प्लान तयार करण्यात आले, मात्र त्याची अमलबंजावणी हवी तशी झालेली दिसुन येत नाही. यासाठी सर्वच विभागाकडुन सामुहीक प्रयत्न होणे अपेक्षीत असुन नागरीकांनी सुध्दा जागृतपणे शुध्द हवेसाठी आग्रही राहीले पाहीजे. air quality alert
शहरातिल प्रदुषण नियत्रंणाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील पहिला प्रयोग या चंद्रपूर शहरात करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांना इको-प्रो तर्फे निवेदन देत मागणी करण्यात आली आहे. सदर ‘एअर प्युरीफायर टॉवर’ उभारून या शहरातील प्रदुषणाचा मारा सहन करणाऱ्या नागरीकांना काही अंशी दिलासा दयावा. प्रथमःता उभारण्यात येणाऱ्या या टॉवर ला ‘पायलट प्रोजेक्ट’ चा दर्जा देत यास ‘खनिज विकास निधी’ मधुन निधी उपलब्ध करून देण्यास विनंती केली असुन या एअर प्युरीफायर टॉवरचा यशस्वी प्रयोगानंतर शहरात अन्य टॉवर उभारण्यास शासनाकडे तसेच विवीध उदयोगांच्या सिएसआर निधीतुन शहरात अन्य टॉवर उभारण्याबाबत निदेंश देणे शक्य होणार आहे. effects of air pollution